24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते तावशीताड येथे विविध विकासकामांचा शुभारंभ*

*आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते तावशीताड येथे विविध विकासकामांचा शुभारंभ*

चार वर्षांत मतदारसंघातील विकासासाठी अडीच हजार कोटींचा निधी – आ अभिमन्यू पवार

औसा ( वृत्तसेवा )- औसा विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी चार वर्षांत तब्बल अडीच हजार कोटींचा निधी उपलब्ध झाला असून या निधीतून मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात कामे होत आहेत.शेतरस्ते, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र रोहित्री, गाव अंतर्गत रस्ते, सभागृह, पाणीपुरवठा योजना, कोल्हापूरी बंधारे, आशियाई विकास बॅक अर्थसहाय्य अंतर्गत रस्ते विकासासाठी साडेआठशे कोटी निधीसह ग्रामीण भागाबरोबर शहराच्या विकासाचा समतोल साधत औसा शहराच्या विकासासाठी दोनशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकंदरीत मतदारसंघाच्या आतापर्यंतच्या इतिहासात या चार वर्षांत सर्वाधिक तब्बल अडीच हजार कोटींचा निधी उपलब्ध झाला असून यापुढेही दुप्पटीने विकास निधी मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.

             औसा तालुक्यातील तावशीताड येथील (दि.१३) रोजी नूतन ग्रामपंचायत इमारतीसह विविध विकास कामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड श्रीकांत सुर्यवंशी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा सुधीर पोतदार, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, भगवान माकणे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष विष्णू कोळी, सरपंच सौ रमा गौतम कांबळे, उपसरपंच अर्जुन घाडगे, सहायक अभियंता सुर्यवंशी,तंटामुक्ती चे अध्यक्ष मोहन जगताप, ग्रामसेवक विकास फडणीस, संजय पवार, जलील पठाण, आण्णासाहेब वाघमारे,पांडूरंग पवार, दिपक नरवडे, रमाकांत वळके, पंडित जगताप, मनोज लंगर, मुरलीधर रोडगे, शरद पवार, सोमनाथ चव्हाण, प्रल्हाद पवार, राम जाधव, नाना लोखंडे, महादेव चेंडके आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

                  यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की मतदारसंघातील विकास कामाबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतरस्ते व मनरेगातून ग्रामसमुध्दी अभियान राबविण्यात आले याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे सांगून महिलांच्या मागणीवरून अवैध दारूविक्री विरोधात लवकरच कडके कायदे अंमलात आणले जाणार आहेत उसे यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.   आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून या चार वर्षांच्या कालावधीत तावशी ताड येथे शेतरस्ते, गाव अंतर्गत रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, पाणी पुरवठा योजनेसाठी स्वतंत्र रोहित्री, वडार समाज सभागृह, बौद्ध समाज मंदिर सुशोभीकरण आदी विविध विकास कामांसाठी तब्बल २ कोटींचा निधी दिला गेला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]