26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeकृषी*आमदार अभिमन्यू पवार किल्लारी कारखान्याला पुर्णरवैभव मिळवून देतील - स्वामी नरेंद्राचार्य महाराज*

*आमदार अभिमन्यू पवार किल्लारी कारखान्याला पुर्णरवैभव मिळवून देतील – स्वामी नरेंद्राचार्य महाराज*

किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा ४० वा गळीत हंगामाचा शुभारंभ ….

औसा – ( हो वृत्तसेवा)-आमदार अभिमन्यू पवार व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या भागातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना सहकारात सुरू करून दिला आहे. आता तो जीवंत ठेवण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे यामध्ये कोणी राजकारण आणू नये कारण सर्वाच्या सहकार्यानेच किल्लारी कारखान्याला गतवैभव प्राप्त होणार आहे.अभिमन्यू पवार हे देवेंद्रजीचे शिष्य असल्याने ते किल्लारी कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे करतील असा मला विश्वास असून आमदार अभिमन्यू पवार किल्लारीला पुर्णरवैभव मिळवून देतील असा विश्वास नानीजधाम चे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी व्यक्त केला आहे.ते (दि.२५) नोव्हेंबर रोजी किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा ४० व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी मंचावर पाचवे पीठाधिपती नाथ संस्थान औसा हभप गुरुबाबा महाराज औसेकर,आमदार अभिमन्यू पवार ,आमदार ज्ञानराज चौगुले ,माजी खासदार रवींद्र गायकवाड ,उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे ,हभप दतात्रय पवार गुरुजी,संताजी चालुक्य ,सौ शोभा अभिमन्यू पवार, सरपंच सौ.सुलक्षणा धनराज बाबळसुरे, उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर प्रवीण फडणीस ,उपनिबंधक सहकारी संस्था एस.आर नाईकवाडे , जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता ,सभापती चंद्रशेखर सोनवणे ,उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे ,प्रा सुधीर पोतदार ,किरण उटगे ,सुहास पाचपुते ,संतोष बेंबडे ,सुनील उटगे ,काकासाहेब मोरे ,युवराज बिराजदार,विजयकुमार सोनवणे, किरण गायकवाड ,अॅड परिक्षीत अभिमन्यू पवार ,निवृत्ती भोसले ,रमेश हेळंबे,आदीसह उपस्थित होते.यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज पुढे म्हणाले की आजारी अवस्थेतील किल्लारी कारखाना आमदार अभिमन्यू पवार यांनी उर्जितावस्थेत आणून त्याला सुरू करीत आहे.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने सहकार्य करीत तो कारखाना जीवन ठेवायचा आहे.आमदार अभिमन्यू पवार हे देवेंद्रजीचे शिष्य असल्याने किल्लारी साखर कारखाना पारदर्शकपणे चालवतील असा विश्वास आहे.

अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभा राहिल्याने हा कारखाना सुरू होत असून त्याला संजीवनी मिळाली आहे.आता हा कारखाना टिकविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे हा कारखाना तुमचा आहे जेव्हा किल्लारी बंद होता तेंव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणी वाली नव्हता त्यावेळी शेतकऱ्यांनी मालकतोड करून ऊस घेऊन जावा लागला आता आमदार अभिमन्यू पवार व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी किल्लारी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा म्हणून सहकारी तत्त्वावर सुरू केला आहे.तो जीवंत कसा ठेवायचा यासाठी सर्वानी प्रयत्न करावा जेणेकरून किल्लारीसह तालुक्यातील विकासाला चालना मिळेल.यामध्ये कोणीही राजकारण आणू नये.कारण सर्वाच्या सहकार्याने किल्लारी सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त होईल.

असे सांगून ते म्हणाले की आमदार अभिमन्यू पवार व माझे नाते वेगळे असून ते माझे लाडके आहेत.या भागाच्या विकासासाठी सर्वानी त्यांच्या पाठीशी उभे राहावे.कारण या भागाच्या विकासासाठी सत्ता आवश्यक आहे.अभिमन्यू यांच्याकडे दुष्टी आहे आणि ती दुष्टी घेऊन ते काम करतात यावेळी मोठय़ा संख्येने शेतकरी सभासद ,यांच्यासह स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक आर.एस.बोरावके यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड श्रीधर जाधव यांनी केले .


किल्लारीला निळकंठेश्वर व स्वामीजींचा आशीर्वाद -हभप गुरुबाबा महाराज औसेकर

नवीन साखर कारखाना सुरू करणार करणे सोपे आहे पण आजारी कारखाना पुन्हा सहकारात सुरू करणे अवघड काम आहे.पण हे अवघड काम आमदार अभिमन्यू पवार यांनी करून दाखवेल आहे.आता हा कारखाना बंद पडू देऊ नका अथवा बंद पाडू नका.हा कारखाना सुरळीतपणे चालावा निळकंठेश्वर व स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या आशिर्वादामुळे सर्व काही व्यवस्थित होईल असा आशावाद हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


मी भक्कमपणे आ.अभिमन्यू पवार यांच्यासोबत – आ ज्ञानराज चौगुले

किल्लारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावरच पुनर्जीवित करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी शर्तीचे प्रयत्न केले आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दुष्टीने उभारलेल्या या कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी मी सदैव आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत भक्कमपणे उभा असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी हक्काच्या किल्लारीला ऊस द्यावा असे आवाहनही यावेळी बोलताना आ ज्ञानराज चौगुले यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]