नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर २०२४:
ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आयोजित झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी आफ्रिकी-आशियाई ग्रामीण विकास संघटनेचे (AARDO) महासचिव डॉ. मनोज नरदेोसिंग यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली.
या चर्चेत महाराष्ट्रातील चालू असलेल्या बांबूवर आधारित उपक्रमांची आणि लोदगा, लातूर ( महाराष्ट्र) येथे स्थापन होणाऱ्या पाशा पटेल स्किल-टेक विद्यापीठाद्वारे कौशल्य विकासाच्या आगामी योजना यावर चर्चा करण्यात आली.
डॉ. नारदेवसिंग यांनी शाश्वत संसाधन म्हणून बांबू लागवडीला चालना देण्यासाठी पटेल यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले, जे AARDO च्या आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण विकास आणि आर्थिक प्रगती वाढविण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. महाराष्ट्रातील बांबू प्रकल्प हे इको-फ्रेंडली उपक्रमांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून उभे राहिले आहेत, जे AARDOच्या सदस्य देशांमधील इतर प्रदेशांना प्रेरणा देऊ शकतात, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
आगामी पाशा पटेल स्किल-टेक विद्यापीठासोबत भागीदारीच्या प्रस्तावावर उत्साह व्यक्त करताना, डॉ. नारदेवसिंग यांनी AARDO च्या तज्ज्ञतेचा आणि संसाधनांचा वापर करून आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण समुदायांमध्ये ज्ञान आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सहकार्य वाढविण्याचे विचार मांडले. हे विद्यापीठ विशेषतः बांबू-आधारित विकासासाठी युवकांना तांत्रिक आणि व्यवसायिक कौशल्य प्रदान करण्यासाठी समर्पित असेल, असेही स्पष्ट केले.
या बैठकीला डॉ. एम. जे. खान, भारतीय खाद्य आणि कृषी चेंबर्सचे अध्यक्ष; जागतिक कृषी मंचाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रम संचालक मिस लीना जेकब; AARDOचे सहायक महासचिव श्री. रामी क्टाइशत; आणि AARDOच्या संशोधन विभागाचे प्रमुख आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. खुश्नुद अली उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारने नुकतंच पर्यावरणीय शाश्वतता हरित महाराष्ट्र आणि ग्रामविकास एकत्रित धोरण निश्चित केले आहे. या बैठकीमुळे AARDO सोबतचा हा सहकार Afro-Asian प्रदेशातील ग्रामीण समृद्धी आणि शाश्वत विकासाला चालना देऊन शाश्वत विकास आणि कौशल्य निर्मितीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे अधोरेखित होत आहे.