19.6 C
Pune
Monday, January 13, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडीआधुनिक युगातही हजारो आई-वडिलांची सेवा करणारा भक्‍त पुंडलिक-आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

आधुनिक युगातही हजारो आई-वडिलांची सेवा करणारा भक्‍त पुंडलिक-आ.संभाजीराव पाटील निलंगेकर


लातूर दि.15-06-2022

भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी आजोबा बळवंतराव पाटील कव्हेकर व आजी सोजरादेवी पाटील कव्हेकर यांच्या स्मरणार्थ हजारो माता-पित्यांना पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिनीचे दर्शन घडविण्याचा योग आणला ही सर्वांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. आपण अध्यात्मिक जीवनामध्ये पुंडलिकाची कथा ऐकली असेल पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या सेवेमध्ये एकढा तल्‍लीन राहतो की, त्यांच्या भेटीसाठी साक्षात पांडुरंगालाही थांबावे लागले हे वास्तव आहे. त्याच पध्दतीने आधुनिक युगातही हजारो आई-वडिलांची सेवा करणारा आधुनिक पुंडलिक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या रूपाने लातूरकरांना मिळालेला आहे हे आपले सद्भाग्यच आहे. असे प्रतिपादन माजी कामगार कल्याणमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.


यावेळी ते शहरातील बसवेश्‍वर चौकामध्ये युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून पंढरपूर दर्शनासाठी आजोबा बळवंतराव पाटील कव्हेकर व आजी सोजरादेवी पाटील कव्हेकर यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या माता-पिता यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, ह.भ.प.श्रीरंग महाराज औसेकर, भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, विश्‍वजीत पाटील कव्हेकर, मंगलबाई पाटील, अनिताताई कदम, प्रमोदिनीताई पाटील, अशोकराव पाटील, एम.एन.एस.बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, आप्पासाहेब पाटील, बालाजी शेळके, संजय गिर, मुध्याध्यापिका सुनिता मुचाटे, सुनिल राठी, दिग्वीजय काथवटे, मनपा स्थायी समिती माजी सभापती दीपक मठपती, शोभाताई भोसले, मुख्याध्यापक मोहन खुरदळे, प्रताप शिंदे, ज्ञानेश्‍वर चाटे, कुलकर्णी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना आ.संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूच्या दर्शनासाठी आले हे पहिल्यांदा घडले आहे. हीच परंपरा हजारो माता-पिता यात्रेच्या माध्यमातून युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी सुरु ठेवलेली आहे ही कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे हा राजकारणाती सेवाभाव टिकवायचा असेल तर अशा माणसांची आपणाला गरज आहे. यांना विशेषपदी सन्मान देऊन सक्रीय ठेवण्याचे काम आपण भाजपा शहर जिल्ह्याच्यावतीने चालू ठेवावे. असे आवाहन करून लातूर महानगरपलिकेच्या प्रचाराची उद्घोषणाही आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी बोलताना केली.


कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्याहस्ते कै.बळवंतराव पाटील कव्हेकर व कै.सोजरादेवी पाटील कव्हेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माता-पिता यात्रेचा शुभारंभ करून 25 टॅ्रव्हल्सच्या माध्यमातून 1250 भाविकांना पंढरपूर येथे विठ्ठल-रूक्मिनीच्या दर्शनासाठी रवाना करण्यात आले. कार्यक्रमाचे प्र्रास्ताविक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अब्दूल गालीब शेख यांनी मानले. यावेळी भाजपा, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


एकविसाव्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


अध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा निष्ठेने केली हे सर्वश्रुत आहे. त्यांच्यावर प्रसन्‍न होऊन भगवान पांडुरंग भेटीसाठी वेळ मागितला तरीही, आई-वडिलांच्या सेवेला प्राधान्य देऊन त्यांनी पांडुरंगाला थांबविले. यातून त्यांची आई-वडिलांप्रतीची सेववृती समोर आली. त्याचपध्दतीने अध्यात्मिक विचाराने प्रभावीत होऊन अजितनेही हजारो भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिनीचे दर्शन घडविण्याचा संकल्प केला आणि त्याची आज परिपूर्तीही केली. योग आणला ही आनंदाची बाब आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती केली. त्यांच्या या कार्याला अध्यात्मिकतेची जोड देवून तीर्थक्षेत्र देहूला भेट दिली. त्यामुळे देशातील या चौफेर प्रगतीमुळे एकविसाव्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करील, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
आजी-आजोबांच्या स्मरणार्थ आजची माता-पिता यात्रा – अजितसिंह पाटील कव्हेकर


आजी-आजोबा व आई-वडिलांच्या संस्कारामुळे आमच्या कुटुंबाची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. त्यांच्या संस्कार व कार्याची पावती म्हणून यंदा पंढरपूरच्या दर्शनासाठी माता-पिता यात्रा आपण काढलेली आहे. 2017 मध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्‍कलकोट वारी काढण्यात आली, 2018 मध्ये तुळजापूर व पंढरपूरची वारी काढण्यात आली, 2019 मध्ये चाकूर तालुक्यातील साई नंदनवन येथे बालयात्रा काढण्यात आली आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवत हजारो माता-पित्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो, या दृष्टिकोणातून व आजी सोजरादेवी पाटील कव्हेकर व आजोबा बळवंतराव पाटील कव्हेकर यांच्या स्मरणार्थ हजारो भक्‍तांना माता-पिता यात्रेच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिनीचे दर्शन घडविण्याचा संकल्प आई-वडिलांच्या आशीर्वादाने आज पूर्ण होत आहे. त्यामुळे ही माता-पिता यात्रा लातूरकरांच्या कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी प्रास्ताविकात बोलताना केले.
पुंडलिक मिळाला अन् हजारो भाविकांना घडली वारी – ह.भ.प.श्रीरंग महाराज औसेकर
यात्रा नाही तर ही अजित भैय्यांनी काढलेली पंढरपूरची वारी आहे. जीवनात येऊन एकदातरी पंढरपूरला जावे आणि विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, ही प्रत्येक भाविकांची इच्छा असते. परंतु त्याची परिपूर्ती होत नाही. पंरतु आधुनिक काळातही पुंडलिकरूपी असलेल्या अजितभैय्यांनी त्यांचीही परिपूर्ती घडवून आणण्याचा संकल्प केला आणि हजारो भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाची संधी मिळाली, यामुळे त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले, असे प्रतिपादन गहिणीनीनाथ महाराज औसेकर यांचे चिरंजीव ह.भ.प.श्रीरंग महाराज औसेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]