शिरूर अनंतपाळ येथे आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय ” आदर्श शिक्षक ” पुरस्कार संपन्न..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-शिरूर अनंतपाळ तालुकास्तरीय “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. पंचायत समितीच्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्काराचे विशेष महत्त्व आहे. तालुक्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना हा पुरस्कार माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
शिक्षक हा समाज घडविणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. समाज प्रबोधनाची एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते आणि म्हणून त्यांना शिक्षणेतर कार्यासाठी व्यस्त ठेवण्याच्या आपण विरोधात आहोत. शिक्षक हा समर्पित भावनेने कार्य करत आहे म्हणून समाज सुशिक्षित व सुसंस्कृत घडताना दिसत आहे. शिक्षकाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून प्रोत्साहित करणे ही आजची गरज आहे. त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे, ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाची जबाबदारी आहे. शिरूर अनंतपाळ पंचायत समिती सातत्याने हे करत असते, याविषयी समाधान वाटते असेही माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर यांनी म्हटले आहे.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.जयश्रीताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा सौ.भारतबाई सोळुंके, जिल्हा परिषद कृषी सभापती गोविंद चिलकुरे, रोहिदास वाघमारे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, शिरूर अनंतपाळ पंचायत समिती सभापती डॉ.नरेश चलमले,सौ.वर्षाताई भिक्का, प्राथमिक शिक्षण अधिकारी भगवान फुलारी,संघटन सरचिटणीस संजय दोरवे, चेअरमन दगडू सोळुंके, गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण जी,गटशिक्षण अधिकारी अनिल पागे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.