◆बीड जिल्ह्यातील मंगईवाडी येथे मोठ्या दिमाखात पार पडला विवाह सोहळा ◆
लातूर : नेहमी विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आदर्श मैत्री फाउंडेशन तर्फे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीचा विवाह लावून देण्यात आला. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील मंगईवाडी येथ हा विवाह सोहळा पार पडला. लातूरच्या आदर्श मैत्री फाउंडेशनने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीचा विवाह लावून देऊन आणखी एक मोठं समाजिक कार्य पार पाडून आपली समाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.
बीड जिल्ह्याचा अंबाजोगाई तालुक्यातील मंगईवाडी येथील रामदास शिंदे या अल्पभूधारक शेतकऱ्याने २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या जयश्री या मुलीचा विवाह आदर्श मैत्री फाउंडेशन व आधार माणुसकीच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्यातील मंगई वाडी इथे हा विवाह सोहळा २१ मे २०२३ रोजी मोठा थाटात पार पडला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी श्रीमती संजीवनी शिंदे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या मुलांना वाढविले. मात्र मुलगी जयश्री शिंदे हिचे लग्न जमले पण लग्न करायचे कसे हा मोठा प्रश्न तिच्या आई समोर असल्याचे ‘आधार माणुसकीचा’ या संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार यांच्या कडे बोलून दाखवले त्यांनी लगेच आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्याकडे जयश्री च्या लग्नाचा विषय सांगितला .
त्यावेळी संतोष बिराजदार यांनी क्षणाचाही विलंब न करता विवाहातील सर्व खर्च, संसार उपयोगी साहित्य, लग्नमंडपाचा तसेच जेवणाचा संपूर्ण आदर्श् मैत्री फौंडेशन च्या वतीने करू तुम्ही तयारी करा असे सांगितले . व २१ मे रोजी मंगई वाडी गावातच मोठ्या थाटात हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यास आदर्श मैत्री फौंडेशन चे मार्गदर्शक तथा दिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजित देशमुख, सोनू डगवाले, आदर्श मैत्री फाउंडेशनचे संचालक , पत्रकार शशिकांत पाटील, राजेश मित्तल, ओमप्रकाश झुरुळे, प्रमोद भोयरेकर, संभाजी नवघरे, संपत जगदाळे, सागर शिवणे, श्रावण चव्हाण, बीड जिल्हाचे अध्यक्ष पप्पू बाहेती, स्वप्नील गौरशेटे, लक्ष्मण चव्हाण,कमलाकर सिनगारे, यादव यांच्या सह,आधार माणुसकीचा या संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार व मंगाईवाडी व येल्दा येथील अनेकाचि उपस्थिती होती.