लातूर -लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री मुक्ताराम पिटले यांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मानित करण्यात आले आहे
17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार श्री सुरेश खाडे साहेब यांच्या हस्ते आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या वेळी सोबत लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी.पी.,लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल,लातूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अमन मित्तल अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, माजी राज्यमंत्री श्री संजय बनसोडे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री भातलवंडे साहेब, तहसीलदार स्वप्निल पवार साहेब यांच्या सह जिल्ह्यातील गृह व महसूल विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते
मुक्ताराम पिटले पोलीस पाटील संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आपल्या गावातील कायदा व सुव्यवस्थेसोबत सामाजिक,व ईतर विविध क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतात. या केलेल्या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख , लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख तसेच पोलीस ठाणे लातूर ग्रामीण व बाभळगाव ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.