लातूर :-
आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे रंगपंचमी साजरी करून येथील पन्नास आजी-आजोबांना आपण समाजापासून वेगळे नाहीयेत. आपल्या कुटुंबातील मुलं- नातवंडा प्रमाणे त्यांच्यासोबत रंगपंचमी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचं काम आदर्श मैत्री फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष बिराजदार व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले.
आपण समाजात राहत असताना प्रत्येक सण उत्सव अगदी आनंदात, थाटात आपल्या कुटुंबियांसमवेत साजरा करत असतो. परंतु समाजातील असे काही घटक असतात ते सण उत्सव यापासून खूप दूर असतात. आशा मातोश्री येतील 50 आजी-आजोबांसोबत आजचा रंगपंचमीचा सण साजरा करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील आजी-आजोबांनी आमच्या कुटुंबातील मुलं नातवंड यांच्यासोबतच हा आजचा सण साजरा झाला आम्ही समाजापासून वेगळे नाही येत याची जाणीव आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे झाली असल्याचे मत आजी-आजोबानी व्यक्त करत आज आम्ही खूप आनंदी आहोत असे दिवस आमच्या आयुष्यात वारंवार यावेत असे मत व्यक्त केले. यावेळी आदर्श मंत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी सर्व आजी-आजोबांना उपस्थित मित्र परिवाराला रंगपंचमीच्या शुभेच्छा देत आदर्श मैत्री फाउंडेशन चे हे नवनवीन सामाजिक उपक्रम वारंवार चालूच राहतील आम्ही वेळोवेळी सतत आपल्या मध्ये येत राहूत. समाजातील प्रत्येक सण उत्सव -आनंदाचा क्षण आम्ही तुमच्यासोबत साजरा करू, आपण एकटे वाटून घेऊ नये. आदर्श मैत्री परिवार आपलाच परिवार आहे. आम्ही सर्वजण आपलीच लेकर आहोत. असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले यावेळी फाऊंडेशनचे संचालक तुकाराम पाटील, शशिकांत पाटील, निलेश राजमाने, दत्ता पाटील, राजेश मित्तल, प्रवीण सूर्यवंशी, अशोक तोगरे, तेजस शेरखाने, संपत जगदाळे, मदन भगत, आकाश जाधव यांनी आजी-आजोबांना रंग लावला व तेवढ्याच आपुलकीने कुटुंबातील नातवां प्रमाणे आम्हा सर्वांनाआजी-आजोबांनी रंग लावला आम्हा सर्वांसोबत गाण्याच्या तालावर थिरकले. यातून आमच्या बालपणीची आठवण आली असही मत यावेळीआजी-आजोबांनी व्यक्त केले.