जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग ठरतोय आत्मनिर्भर व्यवसाय मार्ग..
प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी एका व्यवसायिकास ” स्पाॅट ” भेट दिली.
निलंगा,-(प्रतिनिधी)-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांना सतत पाठपुरावा करून माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अथक प्रयत्नाने जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (752) उदयास आला.भारतातील मसलगा येथील पहिला पुल याच मार्गावर असल्याने भारताचा आत्मनिर्भर मार्ग म्हणुन व्यवसाय करण्यासाठी आणि दळणवळणासाठी महामार्ग ठरत आहे.

जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ होण्यासाठी प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी गौर ( आनदवाडी ) येथील भाजपा बुथप्रमुख दिनकर चवरे या तरूणाने तर पुणे शहर सोडून ग्रामीण भागात महामार्गावरून सुरू केलेला व्यवसायाला भेट देऊन पाहणी केली.याप्रसंगी उपस्थितांशी संवादही साधले.देशाचे पतप्रधान नरेंद्र मोदी मागील कांही वर्षापासून देशातील तरूणांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी मिळवून देऊन देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्याचाच भाग लातूर-निटूर-निलंगा-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक तरूणांनी आपला व्यवसाय थाटला आहे.हा महामार्ग आत्मनिर्भर भारताचा महामार्ग बनत असल्याचे मत प्रदेश सचिव तथा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.
अनेक शहरी भागातील तरूण जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग झाल्याने त्यांनी आपल्या ग्रामीण भागात येऊन यामार्गावर व्यवसाय थाटत असल्याने भारताचा आत्मनिर्भर मार्ग ठरत असल्याचेही व्यक्त केले.याप्रसंगी शेंदचे सरपंच बालाजी मोगरगे,बाळासाहेब पाटील आदी जण उपस्थित होते.
