18.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*...आणि आमदार अभिमन्यू पवार धावून आले!*

*…आणि आमदार अभिमन्यू पवार धावून आले!*

कात्रीत सापडलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या मदतीला पुन्हा एकदा आ अभिमन्यू पवार धावले

एसईबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांचा अवधी मिळवून दिला…

औसा – ( वृत्तसेवा )-सध्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने जात वैधता करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्जांची संख्या आल्याने तसेच प्रशासकीय यंत्रणेवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा भार असल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब आमदार अभिमन्यू पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सदरील अडचण लक्षात आणून देत यातून मराठा विद्यार्थ्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. हि मागणी शासनाने गांभीर्याने घेत एसईबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर ६ महिन्यापर्यंतची वाढीव मुदत देण्याचा निर्णय घोषित केला आहे. 

मराठा समाजासाठी नव्याने लागू झालेल्या एसईबीसी आरक्षणातून अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सध्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे परंतु जात वैधता करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्जांची संख्या आल्याने तसेच प्रशासकीय यंत्रणेवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा भार असल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी १८ जुलै रोजी आ अभिमन्यू पवार यांच्याकडे बोलून दाखवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आ अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे व सचिव विकास खारगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून एसईबीसी प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी लागणारे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या आणि यातून मराठा विद्यार्थ्यांची सुटका करण्याची मागणी केली.आ अभिमन्यू पवार हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून या विषयाचा पाठपुरावा करत होते.अखेर त्यांनी केलेली मागणी शासनाने गांभीर्याने घेतली असून एसईबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर ६ महिन्यापर्यंतची वाढीव मुदत दिली आहे.दि २२ जुलै रोजी शासन आदेश काढून एसईबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर ६ महिन्यापर्यंतची वाढीव मुदत देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. 

मराठा विद्यार्थ्यांसाठी आ पवार ठरत आहेत संकटमोचक

२०२० ला महावितरणमध्ये एसईबीसी आरक्षणातून निवड झालेल्या पण आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्त्या रखडलेल्या २८२ मराठा तरुणांना आ अभिमन्यू पवार यांनी महायुती सरकार आल्यानंतर अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्त्या मिळवून दिल्या. राज्यसेवा २०२४ परीक्षेचा अर्ज खुल्या किंवा आर्थिक मागास प्रवर्गातून भरलेल्या मराठा उमेदवारांना एसईबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर प्रवर्ग बदलण्याची संधी सुद्धा आ अभिमन्यू पवार यांनीच मिळवून दिली. एसईबीसी प्रमाणपत्र मिळवायला अडचण येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आ पवार यांनीच राज्यभरातील तहसील कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यरत राहतील अशी व्यवस्था करून दिली आणि आता पुन्हा त्यांनीच एसईबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर 6 महिन्यापर्यंतची वाढीव मुदत मिळवून दिली आहे. एकूणच कात्रीत सापडलेल्या मराठा तरुणांसाठी आमदार पवार संकटमोचक ठरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]