छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत २५ आॅक्टोबरला आ अभिमन्यू पवार यांचा उमेदवारी अर्ज होणार दाखल..
औसा – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती चे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार दि.२५ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई, रयत क्रांती संघटना व महायुती मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर औसा येथून गांधी चौक – हनुमान मंदिर – तहसील कार्यालय अशी शंखनाद रॅली आयोजित करण्यात आली आहे.
महायुती च्या पहिल्याच यादीत आमदार अभिमन्यू पवार यांच्या नावाचा समावेश झाला असून भाजप पक्षाकडून त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये आमदार अभिमन्यू पवार यांना पक्षाने पहिल्यांदा उमेदवारी दिल्यानंतर ते मताधिक्याने विजयी झाले आहेत. या पाच वर्षांत मतदारसंघात विकासाचे राजकारण करीत त्यांनी विकासाचा अनुशेष भरून काढला आहे. याचबरोबर शेत तिथे रस्ता, मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत मतदारसंघाची वेगळी ओळख राज्याला करून दिली आहे मतदारसंघातील सिंचनक्षेत्र वाढविणे, उद्योगाला चालना व रोजगार निर्मिती आदीसह रस्ते विकास, आदीवर त्यांनी प्रभावीपणे काम केले असून मतदारसंघाचे प्रश्न विधीमंडळाच्या माध्यमातून सोडविण्यावर त्यांनी विशेष काम केले आहे. त्यामुळे प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. एकंदरीत २५ आॅक्टोबरला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अभिमन्यू पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई, रयत क्रांती संघटना व महायुती मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी अॅड मुक्तेश्वर वाघदरे व भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली आहे.