जाहीर व्याख्यान व बक्षीस समारंभाचे मंगळवारी आयोजन
इचलकरंजी ता.२० लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त समाजवादी प्रबोधिनी ,प्रबोधन वाचनालय आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक प्राचार्य डॉ.टी.एस. पाटील यांचे ” आजच्या संदर्भात शाहू ” या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे..
या संयोजक संस्थांच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ मी मतदार : माझी जबाबदारी ‘ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा बक्षीस समारंभही यावेळी होणार आहे. व्याख्यान व बक्षीस समारंभ राजर्षी शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवार ता. २५ जून २०२४ सायं.६ वाजता समाजवादी प्रबोधिनी , राजर्षी शाहू पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व जिज्ञासूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.