19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeलेख*आजच्या लातूरच्या उदरात प्राचीन लट्टलूर शोध मोहिम….!!*

*आजच्या लातूरच्या उदरात प्राचीन लट्टलूर शोध मोहिम….!!*

आज पहाटे 5.30 घरातून निघालो… जुन्या रेणापूर नाक्यावर ज्येष्ठ पत्रकार अभय मिरजकर Abhay Mirajkar ,आमचा उत्साही युवा मित्र ऋषिकेश दरेकर Rushikesh Anil Darekar आणि लातूर देवराईचे सुपर्ण जगताप Suparn Jagtap एकत्र भेटलो… रत्नापूर ( म्हणजेच लातूर ) या गावात जाणाऱ्या जुन्या रस्त्यावरून निघालो…

पहिलं स्थान बघितलं पापविनाश मंदिर.. तिथले अनेक अवशेष… आणि तिथला शिलालेख…जूनी बारव.. जुन्या मंदिराचा परिसर यासगळ्या गोष्टीच्या नोंदी घेऊन.. आम्ही गेलो.. आजच्या भिमाशंकर मंदिरात.. अजूनही ते बऱ्याच एकांतात आणि पानथळ भागात… तिथेही अनेक प्राचीन मुर्त्या जुन्या देवालयाचे अवशेष.. तिथली बारव.. आज इथं शेत असलं तरी तिथली पांढरी सांगतेय इथं माणसं नांदत होती.. मग तिथे एकाने सांगितले.. 30 वर्षांपूर्वी ड्रेनेज लाईन खोदताना अनेक मातीचे भांडे, खापरं निघाली.. त्याच्याही नोंदी घेऊन… त्याच्या पेक्षाही अधिक पांढरी असलेल्या भागात.. चक्क भुयारात ब्याळी बसव्व अण्णा हे शिव मंदिर बघितले..

भुयारी मार्गात.. सिमेंट मारलेल्या भिंतीत प्राचीन मुर्त्याचे अस्तित्व जाणवतील एवढ्या ठळक मुर्त्या दिसल्या त्या नोंदी घेऊन…पांढरीवर उभे असलेले वाडे बघत फिरत होतो.. एक हलकुडे यांचा प्रचंड मोठा वाडा, आणि आमचे मित्र सुपर्ण जगताप यांचा चौसप जुना गावातला वाडा अगदी आत जाऊन बघितला… त्या वाड्याच्या खाली कमीत कमी पाच एक पुरुष पांढरी माती असावी… ते सगळे नोंदवून बाहेर पडल्यास प्राचीन अवशेष नजरेस पडलं.. आजुबाजूने सगळीकडे सिमेंट काँक्रेट असलेल्या भागात जुन्या भव्य द्वार असलेल्या चिरेबंदीच्या फांजी लोकांनी जपून ठेवल्या आहेत.. त्या चिऱ्यांनी मात्र मला तिथे थांबवलं.. आम्ही त्याचे निरीक्षण केले त्या वेळी हा भव्य राजवाडा असेल त्याचे एक द्वार असेल या निष्कर्षावर येऊन थांबलो.. आजुबाजूच्या पांढरीचा व्यास तीन चार गल्या व्यापणारा असल्यामुळे… आणि त्या खाली बरेच अवशेष दाबले गेले असल्यामुळे अनेक प्राचीन इतिहासातील पानांना बोलतं करता येऊ शकतं…

राजा राष्ट्रकुट गोंविंद ज्याची पहिले राज्य मानगंगा तिरावर होतं ते राष्ट्रकुट दंतीदुर्ग ज्याच्या राज्याच्या सीमा दक्षिणेत रामेश्वर पर्यंत उत्तरेत माळवाच्या नर्मदा नदी ओलांडून होत्या..जो स्वतःला लट्टलूरधीश्वर ( आजचे लातूर ) म्हणायचा.. त्याला ही पांढरी अधिक पुष्टी देते.. पुढे 10 व्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रकुटाकडून राज्य ताब्यात मिळवणारा कल्याण चालुक्याचा संस्थापक तैलप याची बायको लट्टलूरची असलेल्या नोंदीला या पांढरीमुळे अजून बळ मिळते… पुढे 11 व्या शतकाच्या पूर्वार्धाला लट्टलूरच्या राजसत्तेचा लंबक गळून पडला … राजसत्तेचं केंद्र सरकून ते यादवाच्या हाती गेलं… आणि ह्या वाड्यानी छोटया मोठ्या मनसुबदाऱ्या झेलत आपला वैभवी इतिहास पोटात घेत गडप करून टाकला असावा पुढे लट्टलूरचं रत्नापूर झालं… मग रत्नेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर.. केशवराज मंदिर हे सगळे सांस्कृतीक वैभव सोबत घेऊन नव्या चकचकित रूपात जुन्या चिऱ्याचे आणि भंगलेल्या मुर्त्याचे अवशेष सोबत घेऊन नांदत आहेत….!!


आज पहाटे 6 पासून 9 पर्यंत हे सगळे बघितले आणि लट्टालूर ते लातूर अनुभवले.. आता हे पानं अधिक पुराव्यानिशी एकत्र करण्याचं काम इथल्या सर्व अभ्यासू मित्रासह करता आलं तर खूप मोठा आनंद होणार आहे… आता पहिला टप्पा संपला पुढचा पाहू.. काय काय हाती लागतं ते…!!

युवराज पाटील

(लेखक हे लातूर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]