आकाश + बायजू‘ज ने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी एमएचटी- सीईटी (MHT-CET) अभ्यासक्रम सुरू केला
• नवीन एमएचटी- सीईटी (MHT-CET) अभ्यासक्रम सुरू करणे हा प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयांची तयारी करणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आकाश + बायजू‘ज च्या दृष्टीचा एक भाग आहे.
• इयत्ता अकरावीसाठी स्वतंत्र बॅचेस तयार केल्या जातील
लातूर, 31 मार्च, 2022:
चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये भारतातील अग्रेसर आकाश + बायजू’ज, ने अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी प्रादेशिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याची इच्छा असलेल्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात सीईटी (सामान्य प्रवेश परीक्षा) अभ्यासक्रम सुरू केला आहे.आकाश + बायजू’ज राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम तयार करण्याची योजना आखत आहे आणि बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू होतील.
नवीन एमएचटी-सीईटी (MHT-CET) अभ्यासक्रम हे स्थानिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याच्या आणि राज्य बोर्डाशी संलग्न शालेय विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या आकाश + बायजू’ज च्या दृष्टीचा एक भाग आहे. ही कृती योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करण्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण उपाय प्रदान करेल.
इयत्ता अकरावीसाठी स्वतंत्र तुकड्या तयार केल्या जातील आणि शिकवण्याचे माध्यम इंग्रजी असेल.
महाराष्ट्रातील 28000 संलग्न शाळांमध्ये सुमारे 28 लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये शिकत आहेत. 2021 मध्ये, 4,14,968 विद्यार्थी एमएचटी- सीईटी( MHT-CET) म्हणून ओळखल्या जाणार्या महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षेसाठी बसले होते.
नवीन उपक्रमाची काही वैशिष्ट्ये अशीः
• इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बॅचेस आयोजित केल्या जातील.
• एमएचटी- सीईटी (MHT-CET) अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करून विस्तृत अभ्यासक्रम तयार केला जाईल
• भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यासारख्या विषयांचा समावेश करताना इयत्ता अकरावीच्या समक्रमित अभ्यासक्रमानुसार उच्च दर्जाचे अभ्यास साहित्य प्रदान केले जाईल.
• आकाश + बायजू’ज द्वारे तयार केलेले अत्यंत आकर्षक चाचणी पेपर
एमएचटी- सीईटी (MHT-CET) कोर्सेसच्या लाँचबद्दल बोलतांना, आकाश + बायजू‘ज चे व्यवस्थापकीय संचालक,आकाश चौधरी, म्हणाले, “आमच्या ‘विद्यार्थी प्रथम’ या दृष्टिकोनाने, प्रादेशिक आणि मुख्य प्रवाहातील विद्यार्थ्यांमधील अंतर कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमच्या सीईटी कोर्सद्वारे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मोठ्या टक्केवारीपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांना एमएचटी-सीईटीसाठी तयार करण्याचे आमचे ध्येय आहे. आमचे उच्च प्रशिक्षित तज्ञ विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मदत करण्यासाठी दर्जेदार मार्गदर्शन करत आहेत.”
आकाश + बायजू‘ज बद्दल
आकाश + बायजू’ज वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा (JEE), शाळा/बोर्ड परीक्षा आणि एनटीएसई (NTSE) केव्हीपीवाय, (KVPY) आणि ऑलिम्पियाड यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक चाचणी पूर्वतयारी सेवा प्रदान करते. “आकाश” ब्रँड हा दर्जेदार प्रशिक्षण आणि विविध वैद्यकीय (NEET) आणि JEE/इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि ऑलिम्पियाडमधील सिद्ध विद्यार्थी निवड ट्रॅक रेकॉर्डशी संबंधित आहे.
चाचणी तयारी उद्योगात 33 वर्षांहून अधिक ऑपरेशनल अनुभवासह, कंपनीकडे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आणि अनेक फाऊंडेशन स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा/ऑलिंपियाड्स, 250+ आकाश केंद्रांचे संपूर्ण भारत नेटवर्क (फ्रँचायझीसह), मोठ्या संख्येने निवडी आहेत आणि वार्षिक विद्यार्थी संख्या 2,75,000 पेक्षा जास्त आहे.
. आकाश समूहाकडे थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड बायजू’ज (BYJU’S) तसेच जगातील सर्वात मोठी खाजगी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन द्वारे गुंतवणूक आहे.