लातूर – लातूर नगरीत उद्योग भवन परिसरात लातूरकरांचे भक्ती स्थळ व भाविकांचे श्रद्धा स्थान अष्टविनायक मंदिरात भाविकांसाठी संस्थेचे संस्थापक विश्वत व नेहमीच अशा धार्मिक कामात अग्रेसर असलेले लातूरचे सुपुत्र व माजी नगराध्यक्ष श्री.प्रदीपजी राठी यांच्या संकल्पनेतून भगवान महादेवाचे विशाल असे शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठापना हजारो भाविकांच्या उपस्थितीत विधिवत करण्यात आली. या प्राण प्रतिष्ठापनासाठी पूर्णा येथील पोरोहित्य प.पु.उमेश महाराज व त्यांचे ६५ ब्रम्हवृंद यांनी विधिवत प्राण प्रतिष्ठापना दि.१६.०७.२०२३ रोजी पहाटे ०५:०० ते ०७:०० वा.करण्यात येवून दिवसभर महारुद्र अभिषेक, पूजा व जप या पुरोहितांनी केले.
हा धार्मिक सोहळा अत्यंत धार्मिक परंपरेनुसार अत्यंत उत्साहावर्धक वातावरणात व शांततेत लातूरकरांसाठी (भक्तांसाठी) अविसमरणीय राहील असा पार पडला. सदरील सोहळ्यात संस्थापक विश्वस्त श्री.प्रदीपजी राठी स्वतः:ची तब्यतेची तमा न बाळगता दिवसभर स्वतः:च्या देखरेखी खाली पार पडला. आज दिवसभर लातूर येथील सामान्य ते दिग्गज मंडळीने हजेरी लावली. सदरील प्राण प्रतिष्ठापनाचे यजमान देवस्थानाचे विश्वस्थ लातूर येथील उदयोजक श्री.दिलीपजी माने सहपरिवार व शिक्षण सम्राट प्रा.श्री.शिवराजजी मोटेगावकर सहपरिवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
आजच्या या धार्मिक सोहळ्यात लातूर येथील श्री.ललितभाई शहा, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीरमण लाहोटी, श्री.तुकाराम पाटील, श्री.आदिनाथ सांगावे, सीए.श्री.लक्ष्मीरमण मालू, सीए.श्री.महेश तापडिया, श्री.विठ्ठलराव चित्ते, श्री.भिमाशंकर देवणीकर, श्री.शरणप्पा कलेमले, श्री.रामबिलास लोया, श्री.व सौ.विवेक रेड्डी, श्री.सूर्यकांत कर्वा, श्री.रामजी लाठी, श्री.रमेश राठी, श्री.राम कोंबडे, श्री.सावता माळी, श्री.वाय.एस.मशायक, श्री.नवनीत भंडारी, पत्रकार श्री.रामेश्वर बद्दर, श्री.सत्यनारायण खटोड, श्री.नरेश सूर्यवंशी, सौ.किरण चित्ते, अॅड.श्री.शिरूरे, श्री.संजय लड्डा व इतर लातूर येथील मान्यवरांची उपस्थिती होती. या सोहळ्याचे निमित्त्य साधून लातूर अर्बन को-ऑप.बँकेच्या वतीने नुकतेच गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्ड केलेली लातूरची कन्या कु.सृष्टी जगताप यांना रु.२१,०००/- चा धनादेश बँकेचे अध्यक्ष श्री.प्रदीप राठी व प.पु.उमेश महाराज यांच्या हस्ते देण्यात आले.