शिवदास खंडागळे यांना अश्वगंधा वनस्पतीचे
एकरी १ लाख २१ हजार रूपये विक्रमी उत्पन्न
सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले अभिनंदन
लातूर *( दि. ६ मे २०२२)*
लातूर तालुक्यातील मळवटी येथील शेतकरी शिवदास नारायण खंडागळे यांनी दीड एकर क्षेत्रावर अश्वगंधा वनस्पतीचे विक्रमी उत्पन्न काढले आहे, या अश्वगंधा आर्युवेदीक वनस्पतीला बाजारपेठेत प्रति कीलो २२० रूपये चांगला दर मिळाल्याने त्यांना एकरी १ लाख २१ हजार रूपयाचे उत्पादन झाले आहे. अश्वगंधा वनस्पतीचे उत्पादन यशस्वीपणे घेतल्या बददल ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
लातूर तालुक्यासह जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना ट्वेन्टीवन ॲग्री प्रा.लि.,ने आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या सोबत पुढाकार घेऊन राबवीली आहे. लातूर तालुक्यातील शेतकऱ्यासाठी सेद्रिंय शेती व सुगंधी वनस्पतीची शेती प्रायोगिक तत्वावर यशस्वी झाले नंतर अश्वगंधा लागवड योजना येथे राबविली जात आहे. ट्वेन्टीवन ॲग्री लि., कडून प्रारंभी सेद्रींय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना लातूर तालुक्यातील महाराणा प्रताप नगर, मळवटी, महापूर, हरंगुळ बु., हरंगुळ खु., चिखुर्डा, आखरवाई, गातेगाव, मांजरी, सारोळा, कव्हा, जमालपूर येथील शेतकऱ्यांसाठी राबवली. या शेतकऱ्यांना ट्वेन्टीवन ॲग्री ली., चे सल्लागार धनजंय राऊत व कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीचे तज्ज्ञ यांनी अश्वगंधा प्रक्षेत्रावर भेटी देऊन वेळोवळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते.
या योजनेतून मळवटी (ता.लातूर) येथील शेतकरी शिवदास नारायण खंडागळे यांनी अश्वगंधा वन्सपतीचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यांनी दीड एकर क्षेत्रावर अश्वगंधा वनस्पतीची लागवड होती. लागवड, निगा व देखभाल, काढणी याकाळात त्यांनी शास्त्रीय पध्दतीने वनस्पती तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने वनस्पती शेती केली. त्यांना दीड एकर क्षेत्रावर ८१३ किलो अश्वगंधाचे उत्पन्न झाले. या अश्वगंधा वनस्पतीला प्रति कीलो २२० रूपये कंपनीकडून दर मिळाला आहे. यातून त्यांना १ लाख ७८ हजार ८६० रूपये उत्पन्न झाले. साधारणपणे खर्च वजा जाता त्यांना एकरी १ लाख २१ हजार रूपयाचे विक्रमी उत्पन्न झाले.
अश्वगंधा ही आर्युवेदीक वनस्पती असून आर्युवेदीक औषधी उपयोगासाठी वनस्पतीची मागणी वाढली आहे. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो असे सांगून अश्वगंधा वनस्पतीचे उत्पादन यशस्वीपणे घेतल्या बददल ट्वेन्टीवन ॲग्री प्रा. लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी शेतकरी शिवदास नारायण खंडागळे यांचे अभिनंदन केले आहे.
ट्वेन्टीवन शुगर लि., चे व्हा. चेअरमन विजय देशमुख, संगिता मोळवणे, धनंजय राऊत यांनी वेळोवेळी अश्वगंधा शेतीस पाहणीसाठी भेटी दिल्या आहेत.
सोबत छायाचित्र : १. शेतकरी शिवदास नारायण खंडागळे
२. अश्वगंधा क्षेत्राची पाहणी
————