निमित्त जलिलमियाँ देशमुख गौरव ग्रंथ सोहळ्याचे चर्चा मात्र विधानसभेच्या उमेदवारीची
निलंगा / प्रतिनिधी :- माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर हे चारित्र्यवान नेतृत्व असल्याने त्यांनी लाखो कर्तृत्ववान कार्यकर्ते घडविले. पक्षासोबत एकनिष्ठ आणि नेत्यावर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची वज्र्यमूठ बांधून आपलं मनगट मजबूत अशोकराव तुम्ही करा. अश्या असंख्य कार्यकर्त्यांचा पाठबळावर अशोकराव तुम्ही माझ्याबरोबर विधानसभेला सोबत मुंबई चला. अशोकराव तुम्ही आणि मी एकत्रित एक विधानसभेसाठी पुर्णतः तयारीकरिता समजूत बैठक घेऊन पुढील निवडणूकीसाठी सज्ज होऊन कामाला लागा. तुमच्या सारख्या सरळ स्वभावाचे गुणवंत नेत्यांची सध्या विधानभवनात गरज आहे. आणि मतदारसंघातील जनतेची इच्छा देखिल हेच असल्याचे दिसून येते म्हणून तुम्ही पक्ष बळकट करण्यासाठी मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून जनतेत जावं.असा सूचक संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा अमहदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिलं.
ते कै.जलिलमियाँ देशमुख गौरव ग्रंथ सोहळा प्रकाशन सोहळा कार्यक्रमा निमित्त सिंदखेड गावी ते बोलत होते…या सूचक संदेशामुळे मतदारसंघात पुन्हा एकदा अशोकराव पाटील निलंगेकरांची विधानसभा उमेदवारीसाठी राजकीय चर्चेला उधाण आलंय. कांग्रेस पक्षाचे नेते अशोकराव साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील विधानसभेच्या उमेदवारी साठी पुढील काळात काम करणार यात शंकाच नाही कारण या सूचक संदेशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अशोकराव आणि बाबासाहेब पाटील यांच्या मैत्रीची चर्चा रंगत आहे….
कै.जलिलमियाँ देशमुख यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्य,काम,पक्ष निष्ठ आणि नेत्यांचा निष्ठवंत या सर्व जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी गौरव ग्रंथ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मौजे सिंदखेड त्यांच्या मूळ गावी आयोजित करण्यात आला होता.यावेळी अनेक मान्यवरांनी जलिलमियाँ देशमुख यांच्या नेत्यांवर असलेली निष्ठा व त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्याचा गौरव उदगार काढून त्यांनी केलेल्या कार्याच्या आठवणीला उजाळा दिला..
त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे डी एन दादा शेळके, संभाजीराव पाटील शिरूरअनंतपाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ, माजी कृषी सभापती मनमंथअप्पा किडे,कांग्रेस चे प्रदेश सचिव अभय साळुंके,माजी जि.प. सदस्य अमर आबा भोसले,पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने,जेष्ठ समाजसेवक लिंबन महारज रेशमे, भाजपचे नेते भाई सुनिल माने,माजी जि. प. सदस्य भरत गोरे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख,जि. प.माजी बांधकाम सभापती मधुकर जाधव,मंजूर अहमद पाशा देशमुख,जळकोट चे नगरसेवक इस्माईल शेख,नगर पंचायत चे माजी सभापती जावेद मिरझा,सिराज देशमुख,फारुख देशमुख,रजनीकांत कांबळे,समियोद्दीन देशमुख, श्रीमंत बलसुरे,प्रा-रोहित बनसोडे, गोविंद सूर्यवंशी, प्रकाश गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष इस्माईल लदाफ,माजी जि. प. सदस्य डॉ संतोष वाघमारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हसन चाऊस,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष उल्हास सूर्यवंशी,मुजाहिद देशमुख, अबरार देशमुख, अखिल देशमुख, सोहेल देशमुख, बाबुराव कोंडजे,शंकर अप्पा कुंभार, जब्बार शेख, सह गावातील महिला भगिनींनी हजारो ग्रामस्थ आदी सह लातुर जिल्ह्यातील औसा,निलंगा, देवणी, चाकूर, जळकोट, शिरूरअनंतपाळ, उदगीर येथिल असंख्य आजी माजी सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे नियोजन व गौरव ग्रंथाचे संकलण कमी वेळेत अतयंत नियोजनबद्ध केल्याबद्दल प्रा-दयानंद चोपणे व अस्लम झारेकर यांचा आ. बाबासाहेब पाटील व अशोकराव पाटील निलंगेकरांनी विशेष सत्कार केला….
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंडितराव धुमाळ यांनी तर सुत्रसंचालन प्रा.दयानंद चोपणे यांनी केले आभार अस्लम झारेकर यांनी मानले……