24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमनोरंजन*अल्ट्रा झकास मराठी ओटीटी ऑगस्टमध्ये थरकाप उडवणार*

*अल्ट्रा झकास मराठी ओटीटी ऑगस्टमध्ये थरकाप उडवणार*

भयावह महिना !!

मुंबई,; दि.४ ( प्रतिनिधी ): – ऑगस्टमध्ये आपला मराठमोळा, महाराष्ट्राचा सर्वांचा आवडता “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी, भय आणि थरार यांचा बार उडवणार आहे. थरारक चित्रपटांचा रोमांचित अनुभव खास तुम्हा रसिक प्रेसक्षकांसाठी सादर असणार आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटी नेहमी आपल्या प्रेक्षकांसाठी अतुलनीय मनोरंजन आणण्याच्या प्रयत्नात असतो. जसजसे दिवस लहान होत जातात आणि सावल्या लांबत जातात, तसतसे अंधाराचे वर्चस्व वाढत जाते आणि विलक्षण भीतीचे वातावरण तयार होते, त्याच पद्धतीने अल्ट्रा झकासवर ऑगस्टमध्ये  सर्व प्रेक्षकांचा अनुभव असणार आहे, तयार रहा हा विलक्षण अनुभव अनुभवण्यासाठी. 

न सोडवलेली खतरनाक रहस्ये आणि गुपितांचा गूढपणे चाललेला काळोखातला भयावह शोध. अनपेक्षित आणि वळणावळणावर थक्क करणारं कथानक असलेले ‘चुझल’ (भयानक रात्र) आणि ‘टेररडॅकटाइल’ (मृत्यूचा तांडव) आणि ‘द ब्लॅकआउट एक्सपेरीमेंट’ (काळोखी रात्र) हे मराठी डब चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘चुझल’ या आत्मा आणि गडद रहस्यांनी भरलेल्या चित्रपटाची कथा एका प्राचीन हवेलीच्या सभोवताली असणाऱ्या गूढ घटनांच्या भोवती फिरते. ‘टेररडॅकटाइल’ची कथा एका ओसाड जंगलात अनपेक्षित घटनांभोवती फिरत उलगडत जाते. तर ‘द ब्लॅकआउट एक्सपेरीमेंट’ मध्ये अनोळखी लोकांचा समूह एका गूढ, अंधारलेल्या आश्रयस्थानातून सुटण्यासाठी प्राणघातक आव्हानांना सामोरे जातात.

अल्ट्रा झकास मराठी ओटीटी हे महाराष्ट्रातील मराठमोळ्या प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीचे मनोरंजनाचे माध्यम आहे, जे चित्रपट, वेब सिरीज आणि फिल्मी कट्ट्यासारखे अनन्य कार्यक्रम विविध शैलींमध्ये प्रेक्षकांसाठी खास सादर करत असते. त्याचप्रमाणे ०३ ऑगस्टला ‘टेररडॅकटाइल’ (मृत्यूचा तांडव) हा आंतरराष्ट्रीय चित्रपट आपल्या मराठी भाषेत ‘अल्ट्रा झकास’वर प्रदर्शित करण्यात आला. या रहस्यप्रधान चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून १७ ऑगस्ट ‘द ब्लॅकआउट एक्सपेरीमेंट’ (काळोखी रात्र) आणि २१ ऑगस्टला ‘चुझल’ (भयानक रात्र) खास तुमच्या भेटीसाठी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येणार आहेत.

प्रेक्षकांना www.ultrajhakaas.com वेबसाइटद्वारे किंवा Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले अधिकृत ULTRA JHAKAAS मराठी ओटीटी अॅप डाउनलोड करून मनोरंजनाचा मसाला पाहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]