लातूर अर्बन को-ऑप बँकेची ऊत्तूंग भरारी
नफा रू. २३.११ कोटी, एन.पी.ए. ० टक्के
लातूर ( वृत्तसेवा ) -लातूर अर्बन को-ऑप बँक लि.,लातूर ने आपला मार्च २०२४ अखेर प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. आर्थिक वर्षाअखेर बँकेचे भाग भांडवल रू.२४.५६ कोटी, ठेवी रू.७३४ कोटी असून बँकेचे कर्ज वाटप रू.४८० कोटी तसेच नेट एन.पी.ए. ० टक्के आहे व बँकेला यंदा नफा रू.२३.११ कोटी झाला आहे.
बँकेच्या व्यवस्थापनाने, अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत या आर्थिक वर्षात प्रभावी वसुली चे धोरण अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने राबवून हे यश मिळवीले आहे. बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार व हितचिंतकांनी जो विश्वास बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळावर ठेवला व बँकेच्या वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला त्यामुळेच हे शक्य झाले आहे. त्याबद्दल संचालक मंडळ त्यांचे ऋणी आहे.
बँकेने मागील वर्षभरात रू.९९ कोटीची व्यवसायात वाढ करून रू.१२१४ कोटी चा व्यवसायाचा पल्ला गाठला आहे. या यशामध्ये बँकेचे व्यवस्थापन मंडळ व बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी रिझर्व्ह बँकेचे व सहकार खात्याचे जे कायदे, नियम, बंधने व मापदंडाचे तंतोतंत पालन करून सभासद, ठेवीदार, खातेदार यांचे हित व विश्वास जोपासले आहे.
बँकेने यावर्षी नेट एन.पी.ए. ०% ठेवण्यात यश मिळवीले आहे व बँकेचा नफा सर्व आवश्यक तरतुदीसह रू.६.५१ कोटी झाला आहे. ही बँकेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. बँकेने सभासदासाठी मागील वर्षी ८.००% डिव्हीडंड दिला असून या पुढेही हीच बाब सातत्याने ठेवण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रदीपजी राठी यांच्या संकल्पनेतून या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणी भागविण्यासाठी स्टाफ कॅश क्रेडीट कर्जे देणे, आरोग्य विमा, सुट्यांचा पगार व उदिष्ट पुर्ण करणाऱ्या शाखा व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर अडीच महिन्यापर्यंतचे वेतन बक्षीस स्वरूपात देण्याचा ठोस निर्णय घेतला आहे.
बँकेने नुकतीच लोकप्रिय व ऐतिहासिक तीन शहरामध्ये आपल्या शाखांची उभारणी केली आहे. ज्यामध्ये सांगली शहरात विजयनगर-जिल्हा कोर्टासमोर, नाशिक शहरात शालिमार-नेहरू गार्डन समोर व कोल्हापूर शहरात राजारामपुरी-लाईन नं. ७ अशा मध्यवर्ती ठिकाणाहून सेवेस सुरुवात केली आहे. अशा प्रकारे बँकेचा विस्तार अजून प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येत आहे.
बँकींग व्यवसायासोबत सामाजीक बांधीलकीतून विनामुल्य वैकुंठरथ सेवा, मोफत स्वच्छ पिण्याचे RO पाणी, कर्मचारी तथा ग्राहक यांचे मार्गदर्शन मेळावे, विविध चांगल्या उपक्रमांना प्रायोजन देऊन असे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक हातभार लावणे, चांगल्या ग्राहकांचा सन्मान करणे, रक्तदान शिबिरे, हेल्थ कॅम्प आदी द्वारे कर्तव्य म्हणून सामाजिक हित जोपासण्याचे कार्य केलेले आहे.
सर्वांच्या सहकार्यामुळे प्राप्त झालेल्या या यशामुळे बँकेचे सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांचे ऋण बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी नवनीत भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.ए.नरेश सूर्यवंशी, सरव्यवस्थापक सत्यनारायण खटोड यांनी व्यक्त केले आहे.
बँकेने नविन आर्थिक वर्षामध्ये रू.८२५ कोटी च्या ठेवीचे उदिष्ट पुर्ण करण्याचा मानस ठेवला आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये आपला सहभाग असावा व सर्वांनी आपले व्यवहार आपल्याच बँकेत वाढवावेत असेही आवाहन बँकेच्या वतीने करण्यात येत आहे.