शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या चारही घटकांना न्याय देणारा पण अर्थभान राखणारा अर्थसंकल्प.- आमदार अभिमन्यू पवार
औसा (वृत्तसेवा ):-शेतकरी महिला युवा आणि गरीब या चारही घटकांना न्याय देणारा पण अर्थभान राखणारा अर्थसंकल्प आहे ,अशी प्रतिक्रिया आमदार अभिमन्यू पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या चारही घटकांना न्याय देणारा आहे. शेतकऱ्यांना प्राकृतिक शेतीकडे वळवण्यासाठी कृषी क्षेत्रात मोठी गुणतवणूक करण्यात आली आहे, १ कोटी तरुणांना वेतनासह कार्यप्रशिक्षण देणारी योजना घोषित करण्यात आली आहे, मुद्रा लोनमध्ये मिळणाऱ्या कर्जत वृद्धी करण्यात आली आहे. गरिबांना ३ कोटी परवडणारी घरे बांधून देण्यासह १ कोटी कुटुंबांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज देण्याची तरतूद सुद्धा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात ११ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून हे करताना वित्तीय तूट किंवा महागाई दर वाढणार नाही याची काळजी सुद्धा घेण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या चारही घटकांना न्याय देणारा पण अर्थभान राखणारा अर्थसंकल्प आहे.असेही आमदार अभिमन्यू पवार यावेळी बोलताना म्हणाले..