प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या अभिनयाबद्दल कौतुक
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-भारतीय जनता पक्षाकडून बुथ पातळीपासून पक्ष संघटनासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली.भाजपा पक्षाचे ८७,००० बूथ प्रमुख, १६,००० शक्ती केंद्र प्रमुख, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी अशा सर्व पातळीवरील १ लाख कार्यकर्त्यांशी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.त्यानंतर झालेल्या भेटीदरम्यान आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकंदरीत संघटनात्मक कार्याविषयी समाधान व्यक्त करत सर्व शक्तिकेंद्र व बूथ प्रमुख यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. आपण सर्वांनी मिळून केलेल्या कार्यामुळे समर्थ बूथ अभियानाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण होत असल्याने प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या कामाच्या पावतीवर कौतुकाची थाप पक्षाने टाकली आहे.
बुथ समितीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती २५ सप्टेंबर पर्यंत “सेवा आणि समर्पण सप्ताह” आपल्याला साजरा करायचा आहे. प्रत्येक बुथ केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांची यादी करून त्यापैकी २१ जणांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करावयाचा असल्याचेही प्रदेश सचिव निलंगेकर यांनी म्हटले आहे.
१७ सप्टेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत समर्थ बुथ अभियान – २ अंतर्गत पेज प्रमुख नेमणूक करून संघटन बांधणीचे दुसरे पर्व सुरू करायचे आहे. या कार्यासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे. आजवर आपण एकजुटीने केलेल्या कार्यामुळे यश प्राप्त झाले, पुढचा टप्पा देखील असाच यशस्वीरित्या पूर्ण होईल असा प्रदेश सचिव निलंगेकर यांना विश्वास वाटत आहे.