माळेगाव कल्याणीत जलजीवन अंतर्गत १ कोटी निधीच्या कामाचे भूमिपूजन
प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचा पुढाकार…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-
माळेगाव कल्याणी येथे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी रूपयांच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले असून असून तात्काळ कामास सुरवात करण्यात आले आहे.
प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी स्वता लक्ष घालून निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी येथे १ कोटी रूपयांचा निधी माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे पालकमंञी असताना मंजूर करून घेतला होता.
जिल्हा परिषद च्या माध्यमातून हा निधी माळेगाव (क) येथे जलजीवन मिशन अंतर्गत आणला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना गावात होत असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.तसेच आता गावात २४ तास नळा ला पाणी येणार असून पाण्याची कमतरता भासणार नाही व लोकांना अडचण होणार नाही अशी ही योजना जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात होत आहे.यासाठी जास्त निधी लागला तर पुन्हा जास्तीचा निधी मंजूर करून आणू आणि महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही अशी ही योजना आहे असे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
यावेळी जि.प.माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे पं.स.सभापती राधा बिराजदार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मंमाळे, निलंगा शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी, माळेगाव कल्याणी चे सरपंच सरस्वती उघाडे,उपसरपंच बळीराम मिरकले, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा किनगे, लक्ष्मीबाई शिंदे,सुमित्रा घंटे,अनिल शिंदे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषरावजी मंमाळे, ,राजाभाऊ पाटील, ताडमुगळी चे सरपंच अंबादासजी पेठे,अॕड प्रशांत पाटील, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस उमेश उमापुरे, किसनराव पाटील गणपत किनगे परमेश्वर मेघे विश्वराज शिंदे शिवाजी ढवीले शिवाजी पाटील विठ्ठल ढविले वसंत साठे दत्ता पोस्ते राजू घंटे दत्ता पोस्ते विजयकुमार ढविले आदी पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती.