गोवा प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल फडणवीस सत्कार
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-“समर्थ बूथ अभियान” पहिल्या टप्प्याचा सविस्तर आढावा त्यांना सादर केला.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी “लाभार्थी सन्मान दिवस” तसेच १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर (पं. दीनदयाळ जी उपाध्याय यांचा वाढदिवस) या दरम्यान “सेवा व समर्पण सप्ताह” आणि भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीपर्यंत चालणारे “समर्थ बूथ अभियान २” या सर्व विषयांवर माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी सविस्तर चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेतले.
माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पक्षातील कामाचा लेखाजोखा मांडला.त्यात, २१ लाख लाभार्थ्यांचा सन्मान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस “लाभार्थी सन्मान दिवस” या नावाने साजरा करण्याच्या संकल्पनेविषयी संपूर्ण नियोजन सादर केले. शक्तीकेंद्र प्रमुख व बूथ प्रमुख यांच्या संघटन बांधणी नंतर आता “समर्थ बूथ अभियान २” अंतर्गत बूथ पातळीवर दिनांक २५ डिसेंबर पर्यंत पेज(पान) प्रमुख पुनर्गठन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्याचेही नियोजन प्रदेश सचिव निलंगेकर यांनी सादर केले.
माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अनुभवसिद्ध मार्गदर्शन कायम दिशादर्शक ठरते. त्यांची प्रत्येक भेट कार्यासाठी नव्याने प्रेरणा देऊन जाते.पक्षातील त्यांची काम करण्याची पध्दत आम्हाला शेवटपर्यंत प्रेरणादायी ठरेल.सोबतचं,राजकीय पटलावर काम करत असताना मागील कालावधीत विविध पदावर त्यांनी मजल मारून पक्षसंघटन वाढीवर भर देण्याचे कामही त्यांनी केल्याने आम्हाला याचा निश्चितचं फायदा होईल,असेही प्रदेश सचिव अरविद पाटील निलंगेकर यांनी सांगितले .
माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोवा प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे.ही नियुक्ती झाल्याने त्यांचे अभिनंदन माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर,माजी पालकमंञी तथाआ.संभाजीरावपाटीलनिलंगेकर,खा.सुधाकर श्रृंगारे, जिल्हाध्यक्ष तथा आ.रमेशअप्पा कराड,आ.अभिमन्यू पवार,माजी आ.सुधाकर भालेराव,माजी आ.विनायकराव पाटील,माजी आ.पाशा पटेल,सदस्य दिलीपराव देशमुख,शैलेश लाहोटी,लातूर जिल्ह्याचे सचिव पंकज कुलकर्णी,गुरूनाथ मग्गे,प्रेरणा होनराव,शिवाजीराव पाटील कव्हेकर,अजित पाटील कव्हेकर,शैलेश गोजमगुंडे आदींनी केले आहे.