16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeआंतरराष्ट्रीय*अमेरिकेतील “सफरचंदाच्या” बागा अर्थातच येथील कृषि पर्यटन*

*अमेरिकेतील “सफरचंदाच्या” बागा अर्थातच येथील कृषि पर्यटन*

ज्यांचं बालपण शेतीत गेलयं पण आता शेतीशी संबंध नाही किंवा स्वत:चं शेत नाही पण शेतीची आवड आहे,शहरी भागातील शालेय विदयार्थी शेतीविषयक माहिती,शेतीचा प्रत्यक्ष अनुभव किंवा ग्रामीण जीवन आणि जेवण ह्याचा आनंद लुटण्यासाठी वीकएंडला बाहेर पडत असतात. त्याचप्रमाणे शेती करत असतानाचं शेतावर भेट देण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांचं मनोरंजन, करमणूक, प्रत्यक्ष सहभाग आणि त्यांना माहिती किंवा शिक्षण देण्याच्या प्रक्रियेतून अतिरिक्त शेती उत्पन्न मिळवणं ह्यालाचं “कृषि पर्यटन” म्हटलं जातं. ही संकल्पना अलीकडच्या काळात आपल्याकडे रूढ होवू लागली आहे. परंतु,अमेरिका किंवा इतर विकसित देशात कृषि पर्यटन खूप पूर्वीपासून सुरू आहे. शहरांपासून तास-दीड तासांच्या अंतरावर ही जागा असल्यास अधिकचं सोईचं असतं. इथं पर्यटक सकाळी येवून दिवसभर किंवा एक दिवस शेतावर राहतात,शेतांना भेटी देतात,हंगामानुसार शेतीवरील कामात सहभागी होतात,ग्रामीण चालीरीती, स्थानिक लोकसंगीत,लोकनृत्य ह्याचा आनंद लुटत असतात. अशाच अमेरिकेतील पोर्टलंड जवळील हूड नदी परिसरातील काही कृषि पर्यटन केंद्रांना भेट देण्याचा नुकताच योग आला.
हूड रिवर फ्रूट लूप येथे पोहचण्यासाठी आपल्याला US84 या महामार्गानं प्रवास करावा लागतो. या महामार्गाच्या एका बाजूला कोलंबिया नदीचं CASCADE पर्वतरांगांमधून वाहणारं निळंशार,विशाल आणि धीरगंभीर पात्र आहे. दुसऱ्या बाजूला ह्याच पर्वताच्या पार्श्वभूमीवर हिरवंगार जंगल आहे. या जंगलातून जाणाऱ्या सरळ महामार्गावरून वेगानं जात आपण हूड नदी या छोट्याश्या शहराजवळ पोचतो.


Pic:Hood River City

हूड रिवर फ्रूट लूप
हूड नदी, पोर्टलॅंडपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर कोलंबिया नदिकाठांवरील एक सुंदर, छोटेसं शहर आहे.येथून 35 नं. चा स्टेट हाय वे सुरू होतो. ह्या हायवे ने आपण 40 कि. मी. परिसरात पसरलेल्या हूड रिवर फ्रूट व्हॅली मध्ये पोचतो.रस्त्याच्या दुतर्फा विविध फळं आणि फुलांच्या बागा वेगाने माग जात या या म्हणून आपल्याला खुणावत असतात. हूड रिव्हर फ्रूट लूप हा फळांच्या बागा, द्राक्षमळे, वाईनरी आणि इतर स्थानिक शेतांचा एक समूह असून त्याला शेती विकासाचा वारसा आहे.हूड नदी परिसरातिल शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी 1992 पासून येथे कृषि पर्यटनाची संकल्पना राबविली जाते

कियोकावा फार्म
रस्त्याच्या बाजूला कियोकावा फार्म आहे. गाडी पार्क करून बागेत जाण्यापूर्वी तेथे चेक इन करताना एक पिशवी आपल्याला दिली जाते आणि आपण कुठल्या रांगांमधील फळं तोडू शकतो ह्याची माहिती दिली जाते. आणि आपण घेतलेल्या पिशवीत भरतील एवढी फळं आपण तोडून घेवून जावू शकतो. कियोकावा फार्म
1911 पासून ह्या भागात सफरचंद आणि पिअर्स उत्पादनात अग्रेसर आहे. हे फार्म माऊंट हूडच्या पायथ्याशी आहे. टुमदार घराच्या पार्श्वभूमीवर घराच्या मागच्या परिसरातच सफरचंद आणि पिअर्स च्या बागा पसरलेल्या दिसतात.या बागांमधून फिरण्याचा, झाडावरील फळांना स्पर्श करण्याचा, ती फळं स्वत; तोडण्याचा अविस्मरणीय आनंद आम्ही घेत होतो.
आपल्यापासून दोन्ही बाजूनी दूरवर एका रांगेमद्धे लागवड केलेली झाडं मनमोहक वाटत होती. हूड रिवर परिसरात उबदार ऊन,बोचरी थंडी त्याचबरोबर ज्वालामुखीची राख मिश्रित जमीन ह्यामुळ येथील सफरचंद चवीला खूपच गोड असतात. हूड रिव्हरमध्ये रेड डिलिशियस, गोल्डन डिलिशियस, फिजू, गाला आणि ग्रॅनी स्मिथ यांसारख्या सफरचंदांच्या अनेक जातीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात. येथील लागवड आणि पिकाची देखभाल देखील शास्त्र शुद्ध पद्धतीनं होत असल्यानं फळांची प्रत देखील चांगली असते.
बाहेर पडताना आपण परत सुरुवातीच्या स्टोर मध्ये जाऊ शकतो.येथे दुसऱ्या प्रकारची अनेक फळं आकर्षक पणे विक्रीसाठी मांडलेली दिसतात. त्याचप्रमाणे इतर अनेक प्रकारची शेती उत्पादनं आपलया स्वागतास उत्सुक दिसतात. आपल्या गरजेनुसार,आवडीनुसार आपण ती माफक दरात विकत घेऊ शकतो.

ड्रेपर गर्ल फार्म
कियोकावाच्या अविस्मरणीय अनुभवानंतर आम्ही तेथूनच पांच मिनीतावर असलेल्या ड्रेपर गर्ल फार्मकडं गेलो. ह्या फार्ममधून mt. हूड पर्वत रांगा खूप सुंदर दिसतात. या फार्मवर आपण विविध फुलांच्या बागांचा अनुभव घेवू शकतो. येथे सुंदर बकरी फार्म देखील आहे. लहान मुलं या बकऱ्यांना चारा घालण्याचा आनंद आणि त्यांच्या बरोबरच्या सहवासाचा अनुभव घेतात.
PIC:Goat farm

हूड रिवर लॅवेंडर व्हॅली.
ह्याचं मार्गावर पुढे हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी सुंदर आणि मनमोहक असे हूड रिवरलॅवेंडर फार्म आहे. लांबवरून तेथील जांभल्या रंगाच्या गवताचे ताटवे दिसत होते. हा सीजनचा शेवट असल्याने फुलांचं प्रमाण जरी कमी असलं तरी देखील त्यातून फिरताना आनंद वाटत होता. या शेतातील फुलांपासून वाफेवर distilled पद्धतीनं 100% शुद्ध सुवासिक तेल तयार करण्यात येतं. ही उत्पादनं येथील स्टोरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात.
PIC:Hood River Lavender Valley Farm
जवळपासच्या शहरांमधून अनेक लोक वेळ काढून या फार्मसना नियमित भेट देत असतात. वर्षभरातील व्यस्त नियोजनामधील त्यांच्या वार्षिक कार्यक्रमांमध्ये कुटुंब अथवा मित्र मंडळी समवेत किमान दोन वेळा येथे भेट देण्याचे नियोजन असते.
असा हा दिवसभरातील आमचा हूड रिवर फ्रूट लूप परिसरातील कृषि पर्यटनाचा अनुभव,मनमोहक,अविस्मरणीय आणि परत परत भेट देण्यासारखा.
{हा संपुर्ण माहितीपट “फेरफटका with शिवाजी फुलसुंदर” या यू ट्यूब उपलब्ध आहे :


https://youtu.be/8gGMr3ZZF5E}

शब्दांकन:
शिवाजी फुलसुंदर
निवृत्त उपमहासंचालक,
दूरदर्शन केंद्र,मुंबई.

@@@@@@@@@@

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]