18.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeदिन विशेष*अमित्रेखा...*

*अमित्रेखा…*

वाढदिवस विशेष

कुठल्या दोन ध्रुवावरची दोन वेगळी माणसे एकमेकांना भेटतात. एकत्र काम करतात. त्यांची केमिस्ट्री रसिकजनांच्या पसंतीस उतरते.

तो होतो अभिनयातील ‘शहेनशहा’
आणि ती होती सोंदर्याची खाण ‘जोहरा जान’

त्याचा ‘मिडास टच’ तिला होताच तिचं सुंदर, मोहक, मादक दिसणाऱ्या आणि चेहऱ्याने बोलणाऱ्या प्रगल्भ अभिनेत्रीत रूपांतर झालं. प्रसंगी शांत राहून आवाजातील धीरगंभीरपणा, सौम्य शब्दांची जरब ती त्याच्याच कडून तर शिकली नाही ना ही शंका मनात यावी. त्याच्या सानिध्यात ती सर्वांगाने अधिक बहरू लागली. ऍक्शन चित्रपटांचा तो बंदा रुपया असला तरी इतर अभिनेत्रींपेक्षा तिच्याबरोबरच्या प्रेमप्रसंगात अधिक हळुवार होताना तो आम्हांला दिसला.

ये कहाँ आ गए हम,
यूँ ही साथ साथ चलते’
म्हणत सिलसिला चालू झाला.

आपल्या मनात तिचा विचार जरी आला तरी त्या विचारांच्या गर्दीत तो असतोच. त्याचा फक्त नामनिर्देश सुद्धा तीच अख्ख आयुष्य व्यापून टाकतं. दुसऱ्याच्या डोळ्यात स्वतःची ओळख पटावी लागते. ती एकदा पटली की आडवळणाने न सांगता तुमच्या आयुष्यात प्रेम येत. अश्या ह्या प्रेमाला अनेक पदर असतात. काही जणांचा आयुष्यावर पडलेला जबरदस्त प्रभाव तुमची जगण्याची दिशाही बदलतो. पण एखाद्याने किती बदलावं दुसऱ्यासाठी…..

त्याच्या रंगात रंगताना तो दुसऱ्याचा असूनही त्याच्या नावाने भांगेत कुंकू मिरवलं. ‘हाँ हमको मुहब्बत है’ असं म्हणत कितीही ओरडलो तरी नको त्या ठिकाणी जीव जडण ही तिची चूकच ठरली….
ती जेवढी दोघांच्या नात्याबद्दल व्यक्त होत राहिली तेवढंच त्याने नेहमीच तिच्याबाबतीत मौन बाळगलं.

‘मैं और मेरी तन्हाई
अक्सर ये बाते करते हैं’

अस म्हणतं त्याने आपली चौकट शेवटपर्यंत सांभाळली.
त्याच्या मौनाचे अर्थ प्रत्येकाने आपल्याला पाहिजे तसे घेतले. संवाद तुटला. एकमेकांच्या वाटा ‘अनोळखी’ म्हणण्या इतपत दुरावल्या.

आता ही ह्या वयाच्या टप्प्यावर कुठल्याही फंक्शनला ती दोघ जरी समोरासमोर आली तरी आम्ही आपले वेडे अजुनही त्यांना एकमेकांच्या डोळ्यांमध्ये शोधू लागतो. उगाच आपलं ‘डोळे बोलतात’ ह्या वाक्याचा अर्थ तेव्हा आम्हां रसिकांना समजतो. अंकात मोजल नाही तरी शब्दांची खोली कळते तसंच पाहिलं नाही एकमेकांना तरी डोळ्यांची बोली कळते. ही बोली टिपायला त्यांच्यावर नेहमीच मीडियाचे कॅमेरे फ्लॅश होत रहातात.

तिचा काल वाढदिवस होता आणि त्याचा आज…. काय हा योगायोग म्हणावा. एका दिवसाने गाठ चुकली असे जन्मतारखांचे आकडे सांगतात. जुळता जुळता काही क्षण असेच निसटून जातात. आपल्या हातात फक्त पाहणं उरतं. कितीही सुखद आठवणी आपल्याला हव्याश्या वाटल्या तरी त्या आठवणींची अपूर्णता मनाला अधिक जाणवते. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाही मग मनाचे काही कप्पे बंद करून उघड्या डोळ्याने आयुष्याला सामोरं जावं लागतं. कदाचित त्या दोघांनी असंच ठरवलं असेल. कधी मनात येत ही असेल…..

सोचता हूँ
मैं कबसे गुमसुम
की जबकि मुझको भी ये खबर है
की तुम नहीं हो कहीं नहीं हो
मगर ये दिल है की कह रहा है

तुम यहीं हो यहीं कहीं हो

सगळ्याच परिकथांचा शेवट ‘हॅपीली एव्हरआफ्टर’ होत नाही हे माहिती असूनही आपलं रसिक मन चुकचुकत रहातं. निदान दहा तारखेच्या मावळत्या बाराला आणि अकराच्या उजाडत्या बाराच्या ठोक्याच्या त्या एका पळभर क्षणी तरी ते एकत्र भेटल्याची जाणीव आम्हांला सतत होत रहाते.

आमच्यासारख्या सिनेरसिकांकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

जयंती देशमुख,अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]