17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीयअफवा.. जल्लोष आणि निराशा...!

अफवा.. जल्लोष आणि निराशा…!

लातूर ग्रामीण मधून महायुतीचे रमेश कराड विजयी : लातूर शहर मतदारसंघातून आघाडीचे अमित देशमुख विजयी


लातूर, ( माध्यम वृत्तसेवा ) लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेश कराड हे विजयी झाले असून त्यांनी विद्यमान आमदार धिरज देशमुख यांचा 6595 मताने पराभव केला. तर लातूर शहर विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पेक्षा 7073 मतांनी विजयी. याचबरोबर औसा मतदारसंघातून महायुतीचे आमदार अभिमन्यू पवार निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर तर उदगीर मधून संजय बनसोडे व अहमदपूर मधून बाबासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत.

या निवडणुकीमध्ये आम्ही देशमुख यांना एक लाख 12 हजार 618 तर भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकर यांना एक लाख पाच हजार 575 45 मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके यांना 26357 मते मिळाली यामध्ये आणि देशमुख 7073 मतांनी विजयी झाले.
परंतु लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांचे प्रतिनिधी प्रमोद जाधव यांनी मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यांच्यातील मोजणीची संख्या, आणि मतदान प्रतिनिधी यांनी नोंद केलेल्या मतांची बेरीज जुळत नसल्यामुळे लातूर ग्रामीण विधानसभेच्या मतदारसंघातील नोंदवलेल्या मतांची फेर मोजणी करावी अशी मागणी केली होती. यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मागणी केलेली फेर मतमोजणी ची मागणी ही संधीध्द स्वरूपाची असल्यामुळे त्यांची फेर मतमोजणीची मागणी फेटाळत असल्याचे जाहीर केले. या निवडणुकीमध्ये धीरज देशमुख यांना एक लाख 5 हजार 456 तर रमेश कराड यांना एक लाख 12 हजार 51 अशी मते पडली. तर वंचित चे विजय अजनीकर यांना 8824 अशी मते पडली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दोन लाख 33 हजार 432 तर पोस्ट मते 2018, अशी एकूण दोन लाख 35 हजार 450 मते पडली होती. यामध्ये रमेश कराड यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विषयी घोषित केले.

अफवेमुळे अर्चना पाटील चाकूरकर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

लातूर शहर मतदार संघामध्ये 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. मात्र 24 फेऱ्या झाल्यानंतर भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकर या विजयी झाल्याच्या बातम्या काही वर प्रसारित झाल्या, आणि भाजपा कार्यकर्त्यांनी अर्चना पाटील चाकूरकर विजयी झाल्याच्या, पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे जिल्हाभरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला, अर्चना पाटील चाकूरकर यांच्या देवघर निवासस्थानी ही गुलाल उधळून पेढे वाटून फटाके फोडून, जल्लोष केला. परंतु त्यांना अद्याप मतमोजणीच्या चार फेऱ्या शिल्लक आहेत हे कळाल्यानंतर हिरमोड झाला. चार फेऱ्यामध्ये अमित देशमुख यांनी मतमोजणी मध्ये आघाडी घेत 7354 मतांनी आघाडीवर होते. रात्री उशिरापर्यंत शहराचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता.

कार्यकर्त्यांचा जल्लोष
लातूर शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा हेरमोड झाला होता. परंतु चार फेऱ्यानंतर अमित देशमुख सुमारे सात हजार मतांनी पुढे आहे हे समजल्यावर मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरभरामध्ये जल्लोष केला. यामुळे शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोण विजयी झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मतमोजणी कोणत्या मतदारसंघाची थांबली. कोणत्या मतदार संघामध्ये फेर मतमोजणी होत आहे. यामध्ये शहरातून नेमके कोण विजयी झाले. याची विचारपूस करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]