अपघाताचे वृत्त

0
212

केज जवळ स्कार्पिओ गाडी पुलावरून कोसळुन

 धारुरच्या युवकाचा मृत्यू

केज/प्रतिनिधी

धारूरहून केज मार्गे अंबाजोगाईकडे जात असतानाकुंबेफळ येथील पुलावरुन गाडी खाली कोसळल्याने कृष्णा सोनटक्के (वय ३५, रा. बाराभाई गल्ली, धारूर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (१८ जुलै) पहाटे ६ वाजताच्या सुमारास झाला.

कृष्णा सोनटक्के हे स्वतःच्या स्कोर्पिओ (Mahindra Scorpio) क्र.एम.एच. ४४ जी. ८३१३ या वाहनातून पहाटे धारुरहून (Dharur) केज मार्गे अंबाजोगाईकडे जात असताना त्यांचा कुंबेफळ येथे गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पुलाखाली कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन त्यांचा मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. कृष्णा सोनटक्के यांच्या पार्थिवावर धारुर येथील वैकुंठ स्मशानभुमीत रविवारी दुपारी १२वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक दत्तात्रय सोनटक्के यांनी दिली.

दरम्यान शहरात अपघाताची माहिती कळताच नातलग घटनास्थळी रवाना झालेत. कृष्णा सोनटक्के हे शहरात सर्वपरिचित होते. यांच्या अकाली अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here