17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeलेख*... अन 'न्यूज स्टोरी टुडे ' वेब पोर्टलचा अल्पावधीतच कारवा बनला!*

*… अन ‘न्यूज स्टोरी टुडे ‘ वेब पोर्टलचा अल्पावधीतच कारवा बनला!*

जीव माझा गुंतला

आपण अजूनही समाज माध्यमांकडे गांभीर्याने पहात नाही.केवळ करमणुकीचे साधन,टाईमपास इत्यादीं साठीच त्याचा वापर करतो. पण या माध्यमाचा कल्पकतेने , समर्पित भावनेने उपयोग केला तर समाजात किती फरक पडू शकतो हे न्युज स्टोरी टुडे पोर्टल ने दाखवून दिलं आहे.
वाचू या पोर्टल विषयीचे श्री सुनील चिटणीस यांचे अनुभव.
– संपादक

न्युज स्टोरी टुडे या पोर्टल ला
२२ जुलै २०२४ रोजी चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रथमत: माझ्या मनस्वी शुभेच्छा.

      प्रवासाला सुरवात करताना आपण मोजकेच प्रवासी असतो .पुढे पुढे अनेक सहप्रवासी येऊन मिळतात अन कारवा तयार होतो. चार वर्षांपूर्वी वाटचाल सुरू झालेल्या न्युज स्टोरी टुडे पोर्टलचा अगदी अल्पावधीत असाच कारवा बनला. त्यात कवी, लेखक, परीक्षक, समीक्षक, असे नाना विचारांचे सोबती मला लाभले. अर्थात या प्रवासात मी ही एक प्रवासीच आहे त्याचा आनंदच वाटतो.  या पोर्टलवर माझं साहित्य सामावून घ्यायची संधी श्री देवेंद्र भुजबळ यांनी दिल्या बद्दल मी त्यांचा मनापासून  ऋणी आहे. 

या पोर्टलवर मी लिखाण सुरू करणेपूर्वी देवेंद्र यांची आणि माझी पहिली भेट श्रीवर्धन येथे श्री मनोज गोगटे यांच्या घरी झाली.मला आठवतंय माझा,
शब्दावाचुन कळले सारे ‘ हा
पहिला लेख ३ सप्टेंबर २०२२ रोजी या पोर्टलवर प्रसिद्ध झाला . इथुन माझा इथला प्रवास सुरू झाला अन पुढे अनेक लेख ,कविता येत राहिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकार दिनी उत्कृष्ट पोर्टल म्हणून पुरस्कार.


संवादातून सुसंवादाकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे ? असं जर मला विचारलं, तर मी खात्रीने सांगेन न्युज स्टोरी टुडे पोर्टल! अन हा मला भावणारा मार्ग आहे. कुठल्याही गोष्टीच्या वाढीसाठी पोषक वातावरण हे लागतंच अन मला ते या पोर्टलच्या माध्यमातून मिळालं. वाचन संस्कृती नव्याने रूजवावी, कवी ,लेखक लिहिते रहावे, कलाकारांना कला सादर करता यावी या भावनेतून सुरू झालेल्या या पोर्टलने आजवर कित्येकांना सामावून घेतले आहे, कित्येकांना प्रोत्साहन दिले आहे. ‘ कविता, पुस्तक परिचय, साहित्य तारका, मी वाचलेलं पुस्तक, माझी जडण घडण, करिअर तयारी, चित्रसफर ‘ या सारख्या अनेक सदरांमधून मनोरंजन व ज्ञानवर्धन झाले आहे, त्याचं सुख लाभलं आहे हे काय थोडे आहे का ? बहुरंगी पाऊस जसा नाना ढंगांनी बरसत असतो, तसंच काव्य, लेखन, परिचय, माहिती यांच्या श्रावणसरी या पोर्टलवरून बरसत असतात अन मला तर त्या आनंदसरी, सुखसरीच वाटतात.

आनंदवन ला भेट.


न्युज स्टोरी टुडे म्हणजे जणु ‘ काजवा महोत्सवच ‘ आहे असा प्रत्यय येत असतो. किती प्रतिभावंत काजवे, मनाला लुभावणारी अक्षरफुले, विविध प्रकारचे लुकलुकणारे नजराणे अन मंद प्रकाशात अनेक विषयांचे वैचारिक चांदणे देत असतात ना! वाचताना स्वतःच काजवा व्हावसं वाटतं, हे असं वाटणं केवळ या पोर्टलमुळेच तर मिळालं आहे.

चतुरस्र कवयित्री शांताबाई शेळके एका कवितेत लिहितात ” प्रत्येकाचा चंद्र आगळा वेगळा, चंद्रप्रकाश झुळझुळताना उधाण आनंदाला ” असं स्वतःचे त्या चंद्रासम वेगळं अस्तित्व असणारे कवी – लेखक या पोर्टलमुळे लाभले, हे ही नसे थोडके. पहिल्या पाऊस सरी बरसल्या की मृदगंध दरवळतो, परंतु पुन्हा मृदगंध लाभण्यासाठी पुढच्या वर्षीच्या पावसाची वाट पहावी लागते. इथे या पोर्टलवर तर कल्पनांचा, प्रतिभेचा, साहित्याचा दरवळ कायमच दरवळत असतो ना! त्याचं कौतुक. आणखी काय हवं असतं बर? साहित्याचा दरवळ मनांत रूंजी घालतोय हे सुख मिळत असतं. मृदगंध म्हणजे नव अंकुराचे द्योतकच, नवनवीन कवी – लेखकांना लेखणी झरणेसाठी लाभलेली सुसंधीच ती.

देवेंद्र भुजबळ यांनी लातूर येथे भेट दिली असता आपल्या माध्यम वृत्त या वाहिनी वर त्यांची मुलाखत घेण्यात आली.


‘ न्युज स्टोरी टुडे ‘ म्हणजे “दीपस्तंभ” आहे, सर्वांना मार्गदर्शक, दिशादर्शक, कुठेही न भरकटता आपल्या मार्गावरचा योग्य पथदर्शक. साहित्याला प्रसिद्धी देण्याचं काम तर करत असतच परंतु अनेक कौतुकास्पद उपक्रमही राबवत असते.इतरांना त्यामुळे स्फुर्ती मिळते, म्हणून कौतुक! व्यथा, दुर्दशा, समाजाची गती, निसर्ग भान यावरही हे पोर्टल बारकाईनं लक्ष ठेऊन असते हे अभिमानास्पद आहेच आहे. कोणत्याही साच्यात बसणार नाही पण स्वतःचे अमुल्य, यथायोग्य मापदंड स्थापन करून आदर्शवत वाटचाल करणारा हे पोर्टल आहे याची झुळूक मला लागली आहे.

पिंपळ्पानांसारखा सळसळणारा, सप्तरंगी आकाशात स्वैर संचार करणारा अन सदोदित लेखकांच्या,वाचकांच्या भेटीला नेणारा हे पोर्टल मला आवडते, भावते, हे नमूद करावेसे वाटते. माणसे जोडणाऱ्या परंपरेचा नवउत्सव सुरू आहे असं वाटतं. अन हा उत्सव म्हणजेच चार वर्षांपूर्वी घेतलेली ही गरुडझेप आहे, या करिता सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला यावं लागतं असं मुळीच नाही तर तांब्याचा चमचा घेऊन जन्माला येणारा सुद्धा यशस्वी गरुडझेप घेऊ शकतो हे या पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी सिद्ध केलं आहे. अन हे निखालस सत्य आहे. याचीच पोचपावती म्हणून या पोर्टलला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

लातूर च्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या निवासस्थानी स्नेह मिलन आणि “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे प्रकाशन.

न्युज स्टोरी टुडे पोर्टल, निरंतर, चिरंतन सुरू रहावे ही माझी श्रीस्वामीं समर्थांकडे प्रार्थना. चार वर्षेच काय ,पोर्टल ने शतक महोत्सव साजरे करावे. असेन मी नसेन मी माझ्या अनंत शुभेच्छा कायमच रहातील, ही माझी ग्वाही.

या पोर्टलने मला खूप काही दिले, परंतु सेतू बांधताना खारकुंडीच्या शेपटीतून रेतीकण पडले, इतके कण जरी मी या पोर्टलला दिले असतील, तरी आनंदच वाटेल. अन त्याहीपेक्षा मला मनापासून सांगावसं वाटतं की, सत्वावीस नक्षत्रांचा स्वामी असलेल्या, कोजागर पौर्णिमेसारखा मंद शीतल चांदणप्रकाश देणारा “देवेंद्र” मला मित्र ,सखा म्हणून लाभला .जणुं ऋणानुबंधांचं नातं जुळून आलं अन माझा जीव गुंतला.

  • सुनील शरद चिटणीस
  • ९०११० ८७७२३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]