*अन्नत्याग आंदोलनाला चांगला प्रतिसाद*

0
234

राज्यातील शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला धडा शिकविणार-आ. संभाजी पाटील निलंगेकर

अन्नत्याग आंदोलनास जिल्हाभरातून उत्स्फुर्त पाठिंबा

लातूर/प्रतिनिधी ः- परराज्यात झालेल्या अन्यायाबाबत राज्यातील सरकार बंद पुकारत असून तो बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत मात्र आपल्या राज्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टी आणि पुरस्थितीने मोठे नुकसान झालेले असून त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. तरीही राज्यातील शेतकर्‍यांना मदत जाहीर न करता सरकारने त्यांना वार्‍यावर सोडले आहेत. राज्यातील नुकसानग्रस्त शेकर्‍यांना भरपाई मिळावी याकरीता आम्ही अन्नत्याग आंदोलन करीत असून तरीही मदत नाही मिळाल्यास सरकारला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टी आणि पुरस्थितीने मोठे नुकसान झालेले असून शेतकर्‍यांना सरसकट मदत मिळावी आणि ज्यांच्या जमीनी खरडून गेल्या आहेत त्यांना विशेष अनुदान मिळावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हा भाजपच्या वतीने लातूर येथील शिवाजी चौकात 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन आजपासून सुरु झालेले आहे. या आंदोलनप्रसंगी उपस्थितींना संबोधीत करताना आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, संघटन सरचिटणीस संजय दोरवे, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा स्वाती जाधव, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, जि.प.च्या उपाध्यक्षा भारतबाई सोळूंके, शहर महिला अध्यक्षा मिना भोसले, मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, किसान मोर्चा अध्यक्ष साहेबराव मुळे, बन्सी भिसे, अनिल भिसे, दशरथ सरवदे, डॉ. बाबासाहेब घुले, सतिष आंबेकर,गोविंद नरहरे, विक्रम शिंदे, हनमत बापू नागटिळक, अशोक केंद्रे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तत्पुर्वी या आंदोलनास माजी आ. विनायकराव पाटील, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, भागवत सोट, रामचंद्र तिरुके, जि.प. कृषी सभापती गोविंद चिलकुरे आदींनी आंदोलनात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. आंदोलन प्रारंभपुर्वी आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी गोलाई येथील जंगदंबा देवीची महाआरती करून आर्शिवाद घेतला. त्यानंतर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.

लातूर जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या दुर्लक्षीत धोरणाने आणि निष्क्रीयतेने जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीच्या नुकसान भरपाईपासून वंचीत रहावे लागले असून याचा निषेध व्यक्त करत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंत्र्यासह राज्य सरकारच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील लाखों शेतकरी आज राज्य सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत. हातातोंडाशी आलेला खरीप पिकाचा घास अस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे हिरावला गेला आहे. किमान रब्बीच्या पेरणीकरीता आणि दिवाळी गोड व्हावी याकरीता राज्य सरकार मदत जाहीर करेल आणि हक्काचा पिकविमा मिळवून देईल याकडे नुकसानग्रस्त शेतकरी डोळे लावून बसला आहे. मात्र तीन आठवडे लोटले गेले असले तरी अद्याप पर्यंत सरकारकडून कोणत्याच मदतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळेच कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी 72 अन्नदात्याचे 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आल्याचे आ. निलंगेकरांनी सांगितले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु असून आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची आम्ही तयारी असून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारने मदत न जाहीर केल्यास राज्यभरात आंदोलनाचा उद्रेक करू असा इशारा आ. निलंगेकरांनी यावेळी दिला.

परराज्यात झालेल्या अन्यायाबाबत सरकारच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. मात्र हा बंद हाणून पाडल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारमधीलच तीन पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरतून जनतेला वेठीस धरण्याचे जे काम केले आहे त्याचा निषेध व्यक्त करत आ. निलंगेकरांनी राज्यातील शेतकर्‍यांना मदत करण्यास अपयशी ठरलेल्या या सरकारच्या हाती आता जनता भोपळा देईल असा विश्वास व्यक्त केला.

आंदोलनाच्या पहिल्यादिवशी पाठिंबा देण्यास आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकर्‍यांना संबोधीत करताना जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या गैरकारभाराचा पाढा वाचत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह सत्तेत सहभागी झालेल्या पक्षांना जनता माफ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत शेतकर्‍यांना तात्काळ मदत न जाहीर केल्यास आणि त्यांना त्यांच्या हक्काचा पिकविमा देण्याचे तात्काळ निर्देश न दिल्यास लातूरात सुरु झालेले अन्नत्याग आंदोलनाचे स्वरूप आगामी काळात अधिक तीव्र करून या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पसरले जाईल असा विश्वास व्यक्त केला.

127 शेतकर्‍यांचा अन्नत्याग तर 32 गावांचा चुल बंद करून पाठिंबा

आजपासून लातूर येथे सुरु झालेला अन्नत्याग आंदोलनात जिल्ह्यातील 127 शेतकर्‍यांनी 72 तास अन्नत्याग करण्याचा निर्धार व्यक्त करत आंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच या आंदोलनास पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील 32 गावांनी आपआपल्या घरातल्या चुली बंद करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविलेला आहे. पुढील दोन दिवसात चुल बंद आंदोलनास आणखी मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या आंदोलनास रयत प्रतिष्ठान, दिव्यांग आघाडी, अखिल भारतीय छावा संघटना, राष्ट्रीय समाजपक्ष यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे .

राज्यातील शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला धडा शिकविणार-आ. संभाजी पाटील निलंगेकर
अन्नत्याग आंदोलनास जिल्हाभरातून उत्स्फुर्त पाठिंबा
लातूर/प्रतिनिधी ः- परराज्यात झालेल्या अन्यायाबाबत राज्यातील सरकार बंद पुकारत असून तो बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत मात्र आपल्या राज्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टी आणि पुरस्थितीने मोठे नुकसान झालेले असून त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. तरीही राज्यातील शेतकर्‍यांना मदत जाहीर न करता सरकारने त्यांना वार्‍यावर सोडले आहेत. राज्यातील नुकसानग्रस्त शेकर्‍यांना भरपाई मिळावी याकरीता आम्ही अन्नत्याग आंदोलन करीत असून तरीही मदत नाही मिळाल्यास सरकारला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टी आणि पुरस्थितीने मोठे नुकसान झालेले असून शेतकर्‍यांना सरसकट मदत मिळावी आणि ज्यांच्या जमीनी खरडून गेल्या आहेत त्यांना विशेष अनुदान मिळावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हा भाजपच्या वतीने लातूर येथील शिवाजी चौकात 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन आजपासून सुरु झालेले आहे. या आंदोलनप्रसंगी उपस्थितींना संबोधीत करताना आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, संघटन सरचिटणीस संजय दोरवे, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा स्वाती जाधव, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, जि.प.च्या उपाध्यक्षा भारतबाई सोळूंके, शहर महिला अध्यक्षा मिना भोसले, मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, किसान मोर्चा अध्यक्ष साहेबराव मुळे, बन्सी भिसे, अनिल भिसे, दशरथ सरवदे, डॉ. बाबासाहेब घुले, सतिष आंबेकर,गोविंद नरहरे, विक्रम शिंदे, हनमत बापू नागटिळक, अशोक केंद्रे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तत्पुर्वी या आंदोलनास माजी आ. विनायकराव पाटील, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, भागवत सोट, रामचंद्र तिरुके, जि.प. कृषी सभापती गोविंद चिलकुरे आदींनी आंदोलनात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. आंदोलन प्रारंभपुर्वी आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी गोलाई येथील जंगदंबा देवीची महाआरती करून आर्शिवाद घेतला. त्यानंतर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
लातूर जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या दुर्लक्षीत धोरणाने आणि निष्क्रीयतेने जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीच्या नुकसान भरपाईपासून वंचीत रहावे लागले असून याचा निषेध व्यक्त करत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंत्र्यासह राज्य सरकारच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले. लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील लाखों शेतकरी आज राज्य सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले आहेत. हातातोंडाशी आलेला खरीप पिकाचा घास अस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे हिरावला गेला आहे. किमान रब्बीच्या पेरणीकरीता आणि दिवाळी गोड व्हावी याकरीता राज्य सरकार मदत जाहीर करेल आणि हक्काचा पिकविमा मिळवून देईल याकडे नुकसानग्रस्त शेतकरी डोळे लावून बसला आहे. मात्र तीन आठवडे लोटले गेले असले तरी अद्याप पर्यंत सरकारकडून कोणत्याच मदतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळेच कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी 72 अन्नदात्याचे 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आल्याचे आ. निलंगेकरांनी सांगितले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु असून आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची आम्ही तयारी असून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारने मदत न जाहीर केल्यास राज्यभरात आंदोलनाचा उद्रेक करू असा इशारा आ. निलंगेकरांनी यावेळी दिला.
परराज्यात झालेल्या अन्यायाबाबत सरकारच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. मात्र हा बंद हाणून पाडल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारमधीलच तीन पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरतून जनतेला वेठीस धरण्याचे जे काम केले आहे त्याचा निषेध व्यक्त करत आ. निलंगेकरांनी राज्यातील शेतकर्‍यांना मदत करण्यास अपयशी ठरलेल्या या सरकारच्या हाती आता जनता भोपळा देईल असा विश्वास व्यक्त केला.
आंदोलनाच्या पहिल्यादिवशी पाठिंबा देण्यास आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकर्‍यांना संबोधीत करताना जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या गैरकारभाराचा पाढा वाचत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह सत्तेत सहभागी झालेल्या पक्षांना जनता माफ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत शेतकर्‍यांना तात्काळ मदत न जाहीर केल्यास आणि त्यांना त्यांच्या हक्काचा पिकविमा देण्याचे तात्काळ निर्देश न दिल्यास लातूरात सुरु झालेले अन्नत्याग आंदोलनाचे स्वरूप आगामी काळात अधिक तीव्र करून या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पसरले जाईल असा विश्वास व्यक्त केला.

     ३२ गावात चूल बंद

127 शेतकर्‍यांचा अन्नत्याग तर 32 गावांचा  चूूल बंद करून पाठिंबा
आजपासून लातूर येथे सुरु झालेला अन्नत्याग आंदोलनात जिल्ह्यातील 127 शेतकर्‍यांनी 72 तास अन्नत्याग करण्याचा निर्धार व्यक्त करत आंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच या आंदोलनास पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील 32 गावांनी आपआपल्या घरातल्या चुली बंद करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविलेला आहे. पुढील दोन दिवसात चुल बंद आंदोलनास आणखी मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या आंदोलनास रयत प्रतिष्ठान, दिव्यांग आघाडी, अखिल भारतीय छावा संघटना, राष्ट्रीय समाजपक्ष यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here