लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट किरण जाधव यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांना छत्र्यांचे वाटप
लातूर प्रतिनिधी-
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष एडवोकेट किरण जाधव यांच्या संकल्पनेतून आगळावेगळा समाज व व्यक्ती उपक्रम राबवण्यात आला आहे. कडक उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांना छत्र्याचे वाटप करून काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.
आपल्या नेत्यांचा मनोभावे वाढदिवस साजरा करताना आज लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट किरण जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर येथे अभिषेक केला, त्यानंतर सुरतशाहवली दर्गा या ठिकाणी चादर चढविण्यात आली तसेच शहरातील इतर अनेक ठिकाणी विविध उपक्रम देखील यावेळी राबविण्यात आले.
यात निश्चितच आगळावेगळा आणि कायमस्वरूपी लक्षात राहणारा समाजोपयोगी कार्यक्रम म्हणजे कडक उन्हाळ्यामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला व्यवसाय करणाऱ्या छोट्या छोट्या व्यवसायिकांना छत्री वाटपाचा उपक्रम होय. यात बूट पॉलिश करणारे, बांगडी विक्रेते, झाडू विक्रेते, भविष्य सांगणारे यांचा समावेश आहे.
यापूर्वीही कोरोना प्रादुर्भावाच्या काळात लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालक मंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांच्या वतीने एक महिना कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल मध्ये मोफत जेवण पाठवण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला होता.
आजही लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शहर जिल्हाध्यक्ष ॲड.किरण जाधव यांच्या पुढाकारातून छत्री वाटपाचा कार्यक्रम काँग्रेसच्या सेवावृती भावनेचा दाखला देत होता.
यावेळी एडव्होकेट किरण जाधव, एड.समद पटेल, गोरोबा लोखंडे, विजयकुमार साबदे, हकीम शेख, कैलास कांबळे, इम्रान सय्यद, महेश काळे, एड.देविदास बोरुळे पाटील, आसिफ बागवान, प्रा.प्रवीण कांबळे, जालिंदर बरडे, ज्ञानेश्वर सागावे, युनुस मोमीन, तबरेज तांबोळी, पंडित कावळे, सुलेखा कारेपूरकर, संजय सूर्यवंशी, यशपाल कांबळे, अमित जाधव, प्रा.एम.पी.देशमुख, बालाजी झिपरे, अभिजित इगे, अकबर माडजे, अभिषेक पतंगे, विष्णुदास धायगुडे, एम.एच.शेख, सुंदर पाटील कव्हेकर, एड. अंगद गायकवाड, करीम तांबोळी, राजू गवळी, जहीर शेख, अक्षय मूरळे, रोहित दयाळ, प्रवीण सावंत, दिनेश रायकोडे, फारुख शेख, पवनकुमार गायकवाड, आकाश मगर, धनराज गायकवाड, अमोल गायकवाड, महेश शिंदे, जफर पटवेकर, अबू मणियार यांच्यासह लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य ऊपस्थित होते.———————————————————————————————