निलंगा-(प्रशांत साळुंके)-
महिलांनीच महिलांचा विकास केला पाहिजे अनेक संकटावर मात करणारी ही स्ञीच असते असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पहिले पुष्प गुंफताना प्रसिद्ध व्याख्याती निकीता पाटील यानी केले.
मराठा सेवा संघ निलंगा वर्षे १४ वे अयोजित दोन दिवशीय व्याख्यान मालेत त्या पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ संगीता कदम व प्रमुख पाहूण्या सुहाशिनी पाटील उपस्थित होत्या.
पुढे बोलताना सौ.निकीता पाटील म्हणाल्या जिजाऊ साविञी मुळेच स्ञीयांना खरे स्वातंत्र्य मिळाले आहे.परंतु काही समाज कंटकामुळे आजही स्ञीया पारंतंञ्यात जीवन जगतात हे आपल्या देशाचे व समाज व्यवस्थेचे दुर्दैव आहे.स्ञीयांचा आवाज दाबल्याने देशाचा विकास होत नाही तर स्ञीयांना स्वातंत्र्य दिलात तरच विकास होतो.आजची स्ञीही ही सक्षम आहे.परंतु अनिष्ट रूढी परंपरा समाजमन हेच स्ञी विकासाचे अडथळे आहे.स्ञीयांना पूर्णपणे स्वांतंञ्य आजही मिळालेले नाही.स्ञीयांना पारतंञ्यात व दबावाखाली आपले जीवन जगावे लागते आहे.याला कुठेतरी समाजानी वाचा फोडलीच पाहिजे.जेवढा समाज स्ञी विकासाबाबत जबाबदार आहे तेवढ्याच स्ञीया देखील जबाबदार आहेत.स्ञीया ह्या आजही भयमुक्त जीवन जगू शकत नाहीत यामुळेच स्ञीयांच्या वाट्याला दुःख जास्त आले आहे.आपल्या पुरूषप्रधान देशात समाजाला पुढे घेऊन जायचे असेल तर स्ञीचा सन्मान केला पाहिजे,तरच समाजाची प्रगती शक्य आहे.
समाजाने घातलेल्या केशवपन,सतीची चाल,विधवा बाबत अनिष्ट चालीरिती जिजाऊ साविञीमुळेच आज आपणास नाहिशा झालेल्या दिसत आहेत.परंतु या परंपरा समुळ नष्ट झाल्या नाहीत,वेगवेगळ्या संतानी आपल्या अभंगवाणीतून मांडलेली मतेही याला कारणीभूत आहेत अशी टीकाही त्यानी यावेळी केली.जिजाऊ साविञी व्याख्यान मालेत महिलांना प्रथमस्थान देऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे निकीता पाटील यानी कौतुक केले.
फोटो ओळी… दीपप्रज्वलन करताना निकिता पाटील, डॉ संगीता कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष बोराडे ताई, समाधान माने दिसत आहेत
या कार्यक्रमाचे प्रास्तविक अर्चना पाटील यानी तर सुञसंचलन वैशाली इंगळे यानी केले व आभार जयश्री शिंदे यानी माणले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ शेषराव शिंदे,विनोद सोनवणे ,एम.एम.जाधव,मोहन घोरपडे,डॉ उध्दव जाधव,उत्तम शेळके,कुमोद लोभे,सतिश हानेगावे,अॕड तिरूपती शिंदे,अजय मोरे,डी.बी.बरमदे,दत्ताञय बाबळसुरे,अनिल जाधव,वैशाली बरमदे,स्नेहा बोळे,नम्रता हाडोळे अदिने परिश्रम घेतले.