नागरबाई पांडुरंगराव लोंढे यांचे निधन
रेणापूर /प्रतिनिधी : रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव येथील नागरबाई पांडुरंगराव लोंढे यांचे शुक्रवारी ( दि .26 जानेवारी ) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले .
लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने. शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली .मृत्यूसमयी त्यांचे वय 84 वर्ष होते . नागरबाई लोंढे यांच्या पश्चात चार मुले ,दोन मुली ,सुना , नातवंडे असा परिवार आहे .स्वर्गीय लोंढे यांच्या पार्थिव देहावर दिनांक.27/1/2024 रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता दर्जी बोरगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत .तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे स्वीय सहाय्यक अजित लोंढे यांचे ते आई होत .नागरबाई पांडुरंगराव लोंढे यांच्या निधनाबद्दल दर्जी बोरगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .