अजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

0
203

सामाजिक उपक्रमाने युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकरांचा वाढदिवस साजरा
विधायक उपक्रम ः 101 जणांचे रक्‍तदान, 48 जणांच्या नेत्र शस्त्रक्रिया तर 50 युवकांनी केला मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प
लातूर दि.01/08/2021
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून शहरातील गौरीशंकर मंदिरात अभिषेक, शेखमियाँ साहेब दर्गा,कव्हा येथे चादर चढविणे, सर्व रोगनिदान व रक्‍तदान शिबीर तसेच एक घर एक वृक्ष अशा अनेेक सामाजिक उपक्रमाने  युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यामध्ये बुधवारी सकाळी 8.30 वा मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिरामध्ये  युवा  नेते अजितसिंह पाटील कव्हेकर व रणजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत महाअभिषेक करण्यात आला. यावेळी श्री.भगवान गौरीशंकर व्यवस्थापन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष बाबूआप्पा सोलापूरे, सहसचिव नंदकिशोर सोनी, सचिव गोवर्धनदास भंडारी, सदस्य रामभाऊ माडगे, आत्माराम झिरमिरे, मंदिर व्यवस्थापक राजकुमार शेटे, पुजारी सोमनाथ स्वामी गणेश शेटे, प्राचार्य मोहन खुरदळे, भाजपा युमोचे सरटिणीस सागर घोडके, राजेश पवार, आदींची उपस्थिती होती.
त्यानंतर कव्हा येथील शेखमियॉ दर्गा येथे भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते चादर चढविण्यात आली. यावेळी  उपसरंपच किशोर घार, शिवशरण थंबा, गोविंद सोदले, नेताजी मस्के, लक्ष्मण सुर्यवंशी, अतिश खंडागळे, अच्युत घार, रसुल पठाण, दिपमाला मस्के यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

तसेच स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज येथे घेण्यात आलेल्या शिबीरात 101 जणांनी रक्‍तदान केले. तर महाराष्ट्र विद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या सर्व रोगनिदान शिबीरात 1700 जणांची तपासणी करण्यात आले. यापैकी 48 जाणांना  नेत्र शस्त्रक्रियेसाठी उदगीरला पाठविण्यात आले. तर महात्मा बसवेश्‍वर मंडल युवा मोर्च्याच्या 50 पदाधिकार्‍यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केलेला आहे. बुधवारी सकाळी कुटुंबियातर्फे अजितसिंह पाटील कव्हेकर यांचे अभिष्ठचिंतन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, सौ.आदिती पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, विश्‍वजीत पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, जेएसपीएमचे समन्वयक संभाजीराव पाटील आदींची उपस्थिती होती.

तसेच आ.अभिमन्यु पवार,  भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे,नगरसेवक मंगेश बिराजदार, गोरोबा गाडेकर, एम.एन.एस.बँकचे संचालक सुर्यकांतराव शेळके, सुभाषअप्पा सुलगुडले,  एम.एन.एस.बँकेचे कार्यकारी संचालक अमरदीप जाधव, उपकार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, प्रा.सतीश यादव, युवा छत्रपतीचे संपादक वैजनाथ देशमुख, उद्योजक विजयकुमार धुमाळ, विनोद जाधव,गणेश कदम, संगम कोटलवार, पत्रकार योगीराज पिसाळ, राजहंस कांबळे, दत्ता परळकर, संतोष सोनवणे, संदिप भोसले,जयद्रथ जाधव, गजेंद्र बोकन, संजय देशपांडे, गणेश गोमचाळे,धनराज पाटील धामनगावकर, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य सचिदानंद  जोशी,डॉ.आशा जोशी, शैलेश कचरे,  सुरेंद्र जाधव, मनोज गायकवाड, राजकुमार साखरे, मुख्याध्यापक मोहन खुरदळे, मु.अ.अरूणा कांदे, सुनिता मुचाटे,अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, गजेंद्र बोकन सागर घोडके, प्रेम मोहिते, शंभूराजे पवार, राहुल भूतडा, अनिकेत शेंडगे, भाजयमो जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, रवी लवटे, महादेव पिटले, संतोष तिवारी, संतोष ठाकूर, संतोष जाधव, राजेश पवार यांच्यासह लातूर शहर व परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करून भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या कैलास निवासस्थानी येऊन शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here