24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडीअजित पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

अजित पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी स्वखर्चातून
700 विद्यार्थ्यांना दाखविला “पावनखिंड” चित्रपट


लातूर दि.14-03-2022


संपूर्ण देशभरात सध्या गाजत असलेला पावनखिंड हा चित्रपट महाराष्ट्राच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेची साक्ष देत दिमाखदारपणे चित्रपट गृहातून प्रदर्शित होतोय. उद्याच्या गौरवशाली भारताच्या भविष्यासाठी आजची विद्यार्थीदशेत असलेली बालकांची पिढी चौफेर व्यक्‍तिमत्वाने संपन्‍न व्हावी या उद्देशाने लातूर महानगरपालिकेतील प्रभाग 18 चे नगरसेवक, युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी स्वसंकल्पातून प्रभागातील विविध शाळांमधील जवळपास 700 विद्यार्थ्यांना “पावनखिंड” हा चित्रपट वातानुकुलीत पी.व्ही.आर. या चित्रपटगृहात मोफत दाखविण्यात आला.


याप्रसंगी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना फुटाणे व नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, बालाजी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाग क्र.18 मधील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालय, संत पाचलेगावकर महाराज विद्यालय, शांतीनिकेतन विद्यालय, महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, महाराष्ट्र विद्यालय इत्यादी शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीसाठी लढणार्‍या मावळ्यांची शौर्यगाथा, इतिहासातील प्रेरक घटना, प्रेरणादायी स्थळ असलेली मूळची घोडखिंड बाजींच्या शौर्यामुळे पावनखिंड कशी झाली? याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व इतिहासातून प्रेरणा घेवून विद्यार्थी राष्ट्ररक्षणासाठी सज्ज व्हावेत या उद्देशाने संपूर्ण स्वखर्चातून नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी हा चित्रपट विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत दाखविला. इतक्यावरच न थांबता विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून या चित्रपटावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


यामध्ये 1. घोडखिंड पावनखिंड कशी झाली? 2. छत्रपती शिवरायांचा मावळा ‘बाजी’ 3.पावनखिंडीत ‘बांदल’ परिवाराचे योगदान 4.छत्रपती शिवरायांबद्दलची मावळ्यांची स्वामीनिष्ठा या विषयावर निबंध लेखन, वर्क्‍तृत्व, वादविवाद, कथा-कथन, नाट्य सादरीकरण या सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून एका विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे तर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


प्रभाग 18 मध्ये गेल्या चार वर्षामध्ये सातत्यपूर्णतेने विविध शालेय, सहशालेय, सामाजिक , सांस्कृतिक उपक्रमाबरोबर कोरोना काळात विविध समाजोपयोगी उपक्रम, मतदार नोंदणी, मोफत रूग्णसेवा, मोफत नेत्रशिबीर बालके, युवा, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक तथा प्रभागातील सर्व समाज घटकांसाठी लोककल्याणकारी उपक्रम राबवून तरूण पिढीला एक नवीन दिशा देणारे उपक्रमशिल नेतृत्व म्हणून नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


याप्रसंगी जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य संदिप पांचाळ, प्राचार्य मोहन खुरदळे, उपप्राचार्य मारूती सूर्यवंशी, मुख्याध्यापक संजय बिराजदार, मुख्याध्यापिका सुनिता मुचाटे, मुख्याध्यापिका अरूणा शिंदे, विकास तोडकर, मुख्याध्यापक अंगद भंडे, दयानंद जाधव, मुख्याध्यापक सुनिल ईप्पर, विशाल कंगणे, उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी, उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत, डॉ.शैलेश कचरे, अब्दूल गालीब शेख, बालाजी बोकडे, श्रीमती उषाताई सरवदे, श्रमती संगिता जगताप, श्रीमती कल्पना बिरंगल, श्रीमती रेखा अंबेसंगे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]