– राहुल लोणीकर यांनी व्यक्त केली अपेक्षा
लातूर दि.12/01/2023
देशाचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 25 डिसेंबर ते 12 जानेवारी 2023 मध्ये अटल पर्व अंतर्गत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेवून राज्यभरातून अटल वक्ते घडविण्याचे काम केलेले आले. याबरोबरच दर्पण दिनानिमित्त पत्रकारितेत योगदान देणार्या पत्रकारांचा सन्मान करण्याचे काम भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून केलेले आहे. तसेच अटल मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे कामही राज्यभरासह लातूर भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. गेल्या तीन वर्षामध्ये अजित पाटील कव्हेकरांनी सक्रीय योगदान देवून आपल्या संघटन कौशल्याच्या आधारे राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पध्दतीने युवा वॉरियर्सचे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्याचा फायदा राज्यातील तरूणांना व्हावा, यासाठी युवा नेते तथा अजितसिंह पाटील कव्हेकरांनी आता राज्याच्या राजकारणात सक्रीय व्हावेे, असे प्रतिभाताई भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले.

यावेळी ते श्री.मारवाडी राजस्थान विद्यालय ते 1.नं चौक या दरम्यान काढण्यात आलेल्या अटल दौड मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा प्रभारी अनिल पाटील बोरगावकर, अरूण पाठक, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दत्ता चेवले, अमोलजी निडवदे, अरूण पाठक, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, आदितीताई अजितसिंह पाटील कव्हेकर, विश्वजीत पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, अॅड.गणेश गोजमगुंडे, गजेंद्र बोकण, सागर घोडके, सुनिल राठी, प्रेम मोहिते, रविशंकर लवटे, राजेश पवार, प्रिया जोगदंड, अॅड.पुनम पांचाळ, पांडूरंग बोडके, गौरव बिडवे, संतोष तिवारी, पुनम पांचाळ, आकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अटल दौड मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर यांचा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच संयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ नियोजनाबद्दल अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दुल गालिब शेख व शिंदे यांनी केले. अटल दौड मॅरैथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

अटल दौड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मात्रे व जाधव प्रथम क्रमांकाचे विजेते
भाजपा युवा मोर्चाच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या अटल दौड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील मुलींच्या वयोगटामध्ये निकीत विठ्ठल मात्रे प्रथम, नंदिनी चंद्रकांत महाके द्वितीय तर सानिया फिरोज पटेल तृतीय हे स्पर्धक तर मुलांच्या गटामध्ये विशाल खंडू जाधव प्रथम, विनय बाळासाहेब ढोबळे द्वितीय तर योगेश नानाभाऊ पडोळे हे विजयी ठरलेले आहेत. 20 ते 60 वर्ष वयोगटातील महिला स्पर्धकामध्ये पुजा उमाकांत श्रीडोळे प्रथम, पल्लवी भिमराव राठोड द्वितीय, परिमला बालासाहेब बाबर तृतीय तर पुरूष गटामध्ये निवृत्ती प्रल्हाद गुडेवार प्रथम, प्रधान विलास किरोळकर द्वितीय, विशाल विष्णू कांबीरे तृतीय आलेले आहेत. तर 61 वर्ष वयोगटावरील स्पर्धकामध्ये लक्ष्मण सखाराम शिंदे व केशव माणिकराव मोटे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात आले. अटल दौड मॅरेथॉनमध्ये प्रथम आलेल्या विजेत्यांना 5100, द्वितीय विजेत्यांना 4100 व तृतीय आलेल्या स्पर्धक विजेत्यांना 3100 रूपये रोख, मेडल व सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
अटल दौड मॅरेथॉनच्या माध्यमातून उत्कृष्ठ खेळाडू घडावेत
-अजितसिंह पाटील कव्हेकर
भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून गेले तीन वर्ष अनेक सामाजिक उपक्रम राबवित सर्वसामान्य घटकातील नागरिकांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. यासाठी सर्वसामान्य घटकातील कार्यकर्ते म्हणून काम करणार्या युवकांची साथ मला आजपर्यंत चांगल्या पध्दतीने मिळालेली आहे. या उत्कृष्ट टीमच्या आधारे कारोना काळात सर्वसामान्य नागरिकांना हेल्पलाईन, अन्नसेवा, ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटरच्या माध्यमातून योग्य ती मदत करण्याचे काम नागनाथ आण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ केलेले आहे. तसेच देशाचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम घेण्याचे काम भाजपा युवामोर्चाच्या माध्यमातून आपण केलेले आहे. त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून युवा दिनानिमित्त अटल दौड मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या असून यामध्ये पाच हजार लातूरकरांनी सहभाग घेतलेला आहे. अशा अटल दौड मॅरेथॉनच्या माध्यमातून भविष्यात उत्कृष्ठ खेळाडू घडावेत असे प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
—————————————————-