रेल्वे राज्यमंत्री दानवे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निटूर ; दि.२४ ( राजकुमार सोनी यांजकडून) —अग्रोहा पर्यंत लवकरच पोहोचणार रेल्वेसेवा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली
भारतीय अग्रवाल संमेलनचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग त्यांनी आपल्या पदाधिकारी यांचे समवेत गुरुवारी रेल्वे भवन दिल्ली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेऊन अग्रोहा रेल मार्ग माध्यम जोडण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष यांचे सोबत वरिष्ठ उपाध्यक्ष रामप्रकाश गर्ग, उत्तरी पश्चिम दिल्ली युवा अध्यक्ष जितेंद्र जैन, पूर्वी दक्षिणी दिल्ली युवा अध्यक्ष भुवनेश सिंघल, महिला अध्यक्ष मीनाक्षी गर्ग, महिला वरिष्ठ उपाध्यक्ष मिनू गुप्ता यांनी राज्यमंत्री यांना महालक्ष्मी मातेचे स्मृतिचिन्ह भेट देऊन सन्मान केला.
राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग यांनी सांगितले की अग्रोहा नगर प्राचीन काळापासून धार्मिक व ऐतिहासिक नगरी आहे. अग्रोहा कलयुग चे अवतारी महाराजा अग्रसेन जी ची राजधानी म्हणून आहे अग्रोहा समस्त अग्रवाल वैश्य समाज चे आस्था व श्रद्धा स्थान आहे ही बाब लक्षात घेऊन भारत सरकार व हरियाणा सरकार द्वारा हिसार आणि अग्रोहा यांच्यामध्ये भारतातील सर्वात मोठे एअरपोर्ट हिसार आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट चे नाव महाराजा अग्रसेन आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट ठेवण्यात आले आहे.
त्यांनी सांगितले की एशिया तील सर्वात मोठा ग्रामीण भागातील मेडिकल कॉलेज महाराजा अग्रसेन मेडिकल कॉलेज अग्रोहा मध्ये आहे.
या ठिकाणी हरियाणा, पंजाब, राजस्थान व देशातील अन्य राज्यातील गरीब नागरिक उप चार करण्यासाठी अग्रोहा येथे येतात. यासोबत अग्रवाल वैश्य समाज सी पितृ नगरी असल्याने
अग्रोहा मध्ये स्थापित समाजाचे आस्था भक्ती व श्रद्धा केंद्र अग्रोहा शक्तीपीठ, परवा धाम तिरुपती बालाजी धाम, रामजी दास बाजोरिया मंदिर, शीतला माता मंदिर व धार्मिक स्थळांचे दर्शनासाठी देशभरातून हजारो श्रद्धाळू रेल्वे व रोड मार्गाने हिसार हुन अग्रोहा येतात येताना त्यांना बऱ्याच समस्या यांचा सामना करावा लागतो.
रेल राज्यमंत्री यांना विनंती आहे की रेल्वे लाइनच्या माध्यमातून जिल्हा हिसार ला देशातील व राज्यातील सर्व प्रमुख नगर व महानगरांना जोडण्यात यावे व हिसार रेल्वे लाईन धर्म नगरी अग्रोहा येथून फतेहबाद पर्यंत करण्यात यावी. त्यामुळे नागरिकांना हि सुविधा विधवा रेल्वेच्या उत्पन्नात भर पडेल. रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेतल्यानंतर विश्वास आहे की अग्रोहा शक्तिपीठ पर्यंत लवकर रेल्वे सेवा सुरू होईल.