लातूर – लातूर जिल्ह्यातील सर्व सैतवाल बांधव व जिल्हा कार्यकारिणी यांची सह विचार सभा शिरूरअंनतपाळ येथे संपन्न झाली . संस्थेच्या केंद्र कार्यकारिणीमध्ये ठरल्या प्रमाणे ग्रामीण भागात राहणारे आपले सैतवाल बंधू भगिनीसुध्दा आपल्या संस्थेशी जोडल्या जावेत त्यांचे संस्थेशी नाते घट्ट व्हावे व संस्थेकडून त्यांच्या अपेक्षा समजाव्यात त्यांचाही वाटा संस्थेच्या कार्यात राहावा या हेतून विभागीय उपाध्यक्ष श्रीमान राजीवजी बुबणे व जिल्हा अध्यक्ष एडवोकेट श्री. देशभूषणजी कंडारकर व संपूर्ण जिल्हा टिमने एकत्रीत येवून ठरवला हा अभिनव उपक्रम अगामी काळात नक्कीच सर्व ग्रामीण व शहरी बांधवासाठी प्रेरक व दिशादर्शक ठरेल या सहविचार सभेसाठी केंद्रीय टिम कडून वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. डॉ. राजेशजी फडकुले, मंत्री मा.श्री. महावीरजी घोडके ,सहप्रवक्ता शैलेशजी कंगळे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या सहविचार सभेसाठी लातूर , शिरूर अनंतपाळ , निलंगा, औसा , उदगीर व संपूर्ण जिल्हयातून सर्व स्तरीय सैतवाल बंधू – भगिनी उपस्थित होते .
.
या सहविचार सभेचे खास वैशिष्ट म्हणजे सर्व शिरूर अनंतपाळकरांचे प्रेमळ आदर आतिथ्थ व चोख रचना व योजना , यासोबतच सर्वांचाच सन्मान यथायोग्य व आदरपूर्वक केला
प्रारंभी लातूरजिल्हा अध्यक्ष एडवोकेट श्री. देशभूषणजी कंडारकर यांनी व जिल्हा सचिव यांनी आतापर्यंत लातूर जिल्हयातील कामाची , सभासदांची संस्थेच्या इतर कार्याचा अहवाल सादर केला . त्यानंतर विभागीय उपाध्यक्ष मा.श्री. राजीवजी बुबणे यांनी या सहविचार सभेची भूमिका व विभागातील प्रत्येक घटक जोडण्यासाठी कार्य करणार असणार असे नमूद करतांना अंतिम सैतवाल बांधव संस्थेच्या कार्यातून जोडला जावा व धार्मिक व आर्थिक सक्षम होण्यासाठी कार्य करणार असल्याचे नमूद केले.
सहप्रवक्ता मा.श्री. शैलेशजी कंगळे यांनी संस्थेकडून आतापर्यंत राबविलेले सर्व उपक्रम , वात्सलदिन मध्ये सर्व समाज बांधवाचा सहभाग संस्थेच्या इतर विभागाचे उपक्रम व त्या विभागाचा अहवाल सांगतांना तरूण ,तरूणींचा अगामी काळात अपेक्षित सहभाग , शिखरजी येथे आर्यनंदी स्मारकाचे कार्य अहवाल , संस्थेच्या कला संस्कृती विभागाने पं. अरविंदजी मुखेडकर यांचे कार्य पुन्हा सुरू झालेले स्वहितवाल संदेश – सैतवाल मुखपत्र ,शिष्यवृत्ती विभाग, जनगनना विभाग हे सांगताना सन्मानीय अध्यक्ष धर्मप्रेमी मा.श्री. दिलीपजी घेवारे साहेब व महामंत्री मा.श्री. नितीनजी नखाते यांनी संस्थेतील प्रत्येक घटकांच्या उन्नती साठी कट्टीबद्ध आहेत हे सांगितले संस्थेचे वरीष्ठ कार्यकर्ते व मंत्री मा.श्री. महावीरजी घोडके यांनी संस्थेचा इतिहास सांगतांना संस्था स्थापन करण्यापासून आतापर्यंत कसे कार्य करत आहे.यासाठी सैतवाल समाजानेही व प्रत्येक घटकांनी संस्थेचे सभासदत्व होणे आवश्यक आहे. तसेच आचार्य आर्यनंदी महाराजांची समाजाची तळमळ समोर ठेवून संस्था कार्य करीत आहे. अनेक वर्षानंतर आपण आता चांगल्या अश्या स्थितीत असून उर्वरीत जैन जाती आपल्या सैतवाल संस्थेच्या कार्याची नोंद घेत आहेत व त्यांना आपल्या कार्यामुळे ही नोंद घ्यावी लागत आहे हे आपल्या संपूर्ण सैतवाल समाजाचे यश व आपल्या अध्यक्षाचे नेतृत्व यातून शक्य झाले असे नमूद केले. लातूर जिल्हयाच्या या सहविचार सभेच्या नियोजनाचे व अनेक श्रावक बंधू भगिनींनी जे विचार मांडले व अपेक्षा व्यक्त केल्या त्याचे स्वागत करून आगामी काळात त्याचे दृश्य स्वरूपात अमंलबजावणी करणार असल्याचे सांगितले . अध्यक्षीय समारोप संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.डॉ.श्री. राजेशजी फडकुले यांनी करतांना संस्थेतील प्रत्येक घटक महत्वाचा असून त्यांनी सहभाग वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करतांना सहविचार सभेसाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या बंधू भगिनींचे कौतुक व अभिनंदन केले. आज सैतवाल समाज एका चांगल्या टप्यावर आहे आपण शिक्षण , धर्म कार्य आणि आर्थिक सुबत्ता या तीन क्षेत्रात कार्य वाढवणार आहोत हे सांगताना ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता आहे त्यांना वाठवण्याचे काम संस्थेमार्फत चालू आहे प्रत्येक घटकांचे प्रश्न आम्ही समजून घेवून समाज उन्नतीसाठी रोड मॅप तयार करू मनातून सर्वांनी एकत्रित येवून संस्थेसाठी व समाजासाठी कार्य करावे असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष सर्वांना सोबत घेवून चालणारे आहेत त्यामुळे आपण आपला सहभाग वाढवावा . विविध उपक्रमामध्ये एकत्रित येण्यातून आपला विकास होणार आहे. संस्थेच्या कार्याची ओळखच आपण आपले बांधव आहेत त्यांचा विकास हेच उदिष्ट संस्था समोर ठेवून कार्य करीत आहे . या सोबतच युवकांसाठी केलेल्या कार्याची माहिती सांगताना वैयक्तिक जीवनातील संघटनात्मक अनुभव अर्थिक संस्थेमुळे समृध्दता त्यातून विकास हे अधोरेखित केले . तसेच सर्वांना शुभेच्छा देवून कोणत्याही अडचणीवेळी आपण संपर्क करा संस्था व फडकुले परिवार आपल्या सोबत असेल अशी हमी दिली
ही सह विचार सभा अत्यंत आनंददायी व खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी नूतन तालुका अध्यक्षांचा व शिरूर अनंतपाळ पेथील कार्यकर्त्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने श्रीमान राजीवजी बुबणे यांनी केला . या सह विचारसभेसाठीप्रमुख पाहुणे व श्री प्रभाकर लवांडे, व्यंकटराव सांगोळे, वीरभद्र दूरुगकर, अनिल टाकळकर, राजकुमार कटके, शोभा कोंडेकर, दर्शना सांगवे ,प्रमोद आळंदकर, सोलापूरचे बाहुबली दुरुगकर, निलेश एखंडे, प्रवीण बुर्से व संपूर्ण शिरूर अनंतपाळ येथील सैतवाल परिवार सहभागी झाला होता .