कळमनुरी येथे अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथेची भव्य मिरवणूक काढून सांगताहा समाप्ती
कळमनुरी प्रतिनिधी
कळमनुरी येथील मोठा मारोती परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भागवत कथा व्यासपिठ भागवत कार ह भ प विष्णु महाराज देशमुख गंगापूरकर गायनकार बाळासाहेब महाराज सुरेगावकर ,गजानन महाराज, ज्ञानेश्वर महाराज कदम, तबलावादक हनुमान शिंदे, माधव महाराज यांनी केले तर ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ दिलीप महाराज महाराज कांडलीकर देविदास बेद्रे यांनी केले तर सूत्रसंचालन ह भ प रामकिसन महाराज ठाकूर बुवा यांनी केले .
सात दिवसातील कीर्तनकार ह भ प प्रकाश महाराज साठे ,ह भ प महिला कीर्तनकार शितलताई साबळे, ह-भ-प नामदेव महाराज लबडे, ह-भ-प विष्णु महाराज देशमुख, ह भ प त्र्यंबक महाराज दस्तापुरकर, ह भ प संजय महाराज कुलकर्णी लातूरकर, शिवशाहीर प्रदीप महाराज नलावडे तर सप्ताह समाप्ती काल्याचे किर्तनकार ह भ प राम महाराज ठाकूर बाबा पंढरपूरकर यांनी केले .
कळमनुरी शहरातून श्रीच्या पालखीची भव्य मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत काढत अखंड हरिनाम सप्ताह सांगता करण्यात आली त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पंचक्रोशीतील गावकरी मंडळी या काल्याच्या किर्तनाला व महाप्रसादाला उपस्थित होती या सात दिवसांमध्ये सर्व भाविक भक्तांनी व गावकरी मंडळींनी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले सर्वांनी सहकार्य केले त्या सर्व मंडळींचे आभार माजी नगराध्यक्ष केशव उर्फ बंडू पाटील बेंद्रे यांनी मानले