कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आ. निलंगेकरांचे आवाहन
लातूर/प्रतिनिधी ः- माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व अक्का फाऊडेशनच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत तरुनी व महिलांच्या आरोग्य समस्यांची जनजागृती करण्यासाठी अक्का फाऊडेशनच्या वतीने प्रोजेक्ट आनंदी सुरु करण्यात येत आहे. या प्रोजेक्टचा शुभारंभ आज दि. 4 जून रोजी ती फाऊडेशनच्या संस्थापक तथा आ. भारती लव्हेकर यांच्या हस्ते तर विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येत आहे. दयानंद सभागृहात दुपारी 2.30 वाजता होणार्या सामाजिक बांधीलकी जोपासणार्या या कार्यक्रमास लातूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
मासिक पाळी संदर्भात समाजात असणारे गैरसमज, अंधश्रद्धा व अशुद्धपणाची भावना दूर करणे,किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी विषयी जागृती निर्माण करून निगा राखण्याची माहिती देणे,सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे,बचत गटामार्फत सॅनिटरी पॅडचे उत्पादन करून रोजगार उपलब्ध करणे,या अभियानात पुरुषांचा सहभाग वाढवणे,आगामी तीन वर्षात मासिक पाळी व आरोग्य विषयी जागरूक जिल्हा अशी लातूरची ओळख करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मासिक पाळी संदर्भात जुन्या रूढी-परंपरा अंगिकारल्या जात असल्याने मुलींचा आत्मविश्वास कमी होणे, शिक्षण अर्धवट सोडणे अशा सामाजिक समस्या निर्माण होत आहेत.याशिवाय मूत्राशयाचा संसर्ग,फंगल इन्फेक्शन,मुत्रमार्गाचा संसर्ग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आदी आजार आहेत.त्यापासून किशोरवयीन मुलींची सुटका करणे यासाठी आ.निलंगेकर यांनी पुढाकार घेतला आहे.
सर्वेक्षण व जागरुकता, वितरण आणि नियोजन व स्वयंपूर्णता अशा तीन टप्प्यात जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे.पहिल्या टप्प्यात निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यातील 25 हजार किशोरवयीन मुलींना आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मासिक मानधनातून सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.या अभियानात पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या आनंदी प्रोजेक्टचा शुभारंभ माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त व अक्का फाऊडेशनच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आज दि. 4 जून रोजी करण्यात येत आहे. ती फाऊडेशनच्या संस्थापक तथा आ. भारती लव्हेकर यांच्या हस्ते तर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक निसार तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येत आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात दुपारी 2.30 वाजता होणार्या या सामाजिक बांधीलकी जोपासणार्या कार्यक्रमास सामाजिक संघटना पदाधिकारी, आरोग्य क्षेत्रात काम करणारे मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी व शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
व्हीडीओ पहाण्यासाठी क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇