33.4 C
Pune
Friday, May 2, 2025
Homeसांस्कृतिक*अकोल्यात रंगणार कव्वाली - मुशायरा*

*अकोल्यात रंगणार कव्वाली – मुशायरा*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त अकोल्यात रंगणार  कव्वालीमुशायरा महोत्सवना. अमीत विलासराव देशमुख, सांस्कृतीक कार्य मंत्री.

अकोला दि. १२ जून.  

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव  निमित्त सांस्कृतिक कार्य विभागा मार्फत, भाषेची विविधता जोपासण्या करिता व कविता, गझल, कव्वाली यांचे सादरीकरण करण्याकरिता अकोला येथे २ दिवसीय  कव्वाली व मुशायरा महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.  दिनांक १३ व १४ जून २०२२ रोजी प्रमिलाताई ओक सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केलेले असून त्यामध्ये काव्य, गझल, कव्वाली सोबतच देशभक्तीपर रचनांचा ही समावेश असेल असेही, अमित विलासराव देशमुख यांनी नमूद केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये, भारतातील सुप्रसिद्ध कव्वाल व मराठी-हिंदी कवी, गझलकार या महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या सुफी गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध सुफी गायक हाजी असलम साबरी, दिल्ली   भारतातील सुप्रसिद्ध कव्वाल सलीम-जावेद, बँगलोर  यांच्या कव्वालीची मेजवानी  रसिक प्रेक्षकांना  प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. सोबतच मराठी, हिंदीतील सुप्रसिद्ध  कवी-गझलकार यांच्या मुशायरा कार्यक्रमाचा आनंद रसिकांना अनुभवता येणार आहे. सदरील कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असुन सर्व रसिकांनी या कार्यक्रमांचा  आस्वाद घ्यावा, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आवाहन केले आहे.

या मुशायरा महोत्सवामध्ये सर्वश्री-

घनश्याम अग्रवाल अकोला,

कपिल जैन यवतमाळ,

डॉ. गणेश गायकवाड साखरखेर्डा,

नितीन देशमुख अमरावती,

अनंत नांदूरकर ‘खलिश’ अमरावती,

अनंत राऊत पुणे,

डॉ.दीपक मोहाळे वर्धा,

निलेश कवडे अकोला,

गोपाल मापारी मोताळा, इत्यादी कलाकार आपल्या बहारदार कविता आणि गझल या महोत्सवात सादर  करून कार्यक्रमात रंगत आणणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त  देशप्रेम, सद्भावना,  बंधुभाव अशा विविध विषांवर कव्वाली, कविता, गझलांचे सादरीकरण होणार आज. दि १३ व १४ जून रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत आयोजित या  सांस्कृतिक कार्य कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या नियोजनातून हा दोन दिवसीय कव्वाली व मुशायरा महोत्सव आयोजित होणार आहे. या महोत्सवास रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन या ‘कलामृताचा आस्वाद घ्यावा’ असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

                                                       —————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]