स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त
लातूर ग्रामीणमध्ये 1 लाख बांबू वृक्ष लागवड करणार
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी दिलेली माहिती
लातूर दि.०३ – लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्ताने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एक लाख बांबू वृक्षाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी दिली.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रभारी यांची बैठक भाजपाच्या संवाद कार्यालयात जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड आणि बांबू लागवड सल्लागार समितीचे राष्ट्रीय सदस्य पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, भागवत सोट, चंद्रसेन लोंढे, प्रदीप मोरे, बाबासाहेब घुले, सतीश आंबेकर, बन्सी भिसे, अँड. दशरथ सरवदे, वसंत करमुडे साहेबराव मुळे, अभिषेक आकनगिरे, अनंत चव्हाण, सुरज शिंदे, महेंद्र गोडभरले, शरद दरेकर यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत असलेल्या गावाचा आढावा घेऊन जिल्हाध्यक्ष आञ रमेशआप्पा कराड यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेनुसार तडजोडी करून भाजपाचाच सरपंच झाला पाहिजे ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे याच ध्येयाने आणि जिद्दीने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, प्रभारींनी बारकाईने लक्ष द्यावे असे आवाहन केले.
देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देशभर बहुउपयोगी बांबू लागवड मोहीम सुरू आहे. माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची १२ डिसेंबर रोजी जयंती असून या निमित्ताने ११ आणि १२ डिसेंबर रोजी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात एक लाख बांबू लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती देऊन आ रमेशआप्पा कराड यांनी वृक्ष लागवडीचे व्यापक स्वरूपात भाजपाच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन करावे असे आवाहन केले.
जगाच्या पाठीवर एकूण क्षेत्रापैकी 33 टक्के वृक्ष आवश्यक असताना प्रत्यक्ष मात्र अत्यंत अल्प प्रमाणात वृक्ष असल्याने निसर्गाचा समतोल बिघडला वातावरणात मोठा बदल झाला यावर मात करण्यासाठी आणि उस शेतीपेक्षा बांबू लागवड अधिक फायद्याची असून बांबू बहुउद्देशीय आहे बांबू पासून १८०० वस्तू तयार होतात अशी माहिती देऊन बांबू लागवड सल्लागार समितीचे राष्ट्रीय सदस्य पाशा पटेल म्हणाले की, एक लाख बांबू लागवडीचा आ रमेशआप्पा कराड यांनी घेतलेला निर्णय अत्यंत महत्वपूर्ण असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाची नोटाला मिळालेल्या मतामुळे जशी देशभर ओळख झाली तशीच बांबू लागवडीची राज्यातच नव्हे तर देशात होणार या कामाची निश्चितच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब दखल घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे त्यांनी बोलून दाखविले.
बैठकीचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. या बैठकीस लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.