लातूर – लातूर येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने मागील 96 महिन्यांपासून अविरतपणे शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी अखंड स्वरयज्ञ सुरू आहे. या महिन्यातील संगीत सभा राम नवमी चे औचित्य साधून छत्तीसगढ रायपूर येथील युवा कलावंत श्री किशन देवांगन यांच्या शास्त्रीय गायनाने 97 वी आवर्तन मासिक संगीत सभा गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी प्रातः 9 :30 वाजता येथील श्री अष्टविनायक मंदिराच्या गणेश हॉल मध्ये आयोजित करण्यात आली आहे,त्याना तबला साथ लातूर येथील प्रसिद्ध तबलावादक श्री. संजय सुवर्णकार व संवादिनी साथ प्राध्यापक शाशिकांत देशमुख हे करणार आहेत .
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री राजकुमार पाटील व प्रमुख अतिथी म्हणून प्रा. महावीर उदगीरकर हे उपस्थित राहणार आहेत. आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानने हा मागील 96 महिन्यांपासून अविरतपणे हा स्वर यज्ञ सुरु केला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कोणतेही मूल्य आकारले जात नाही विनामूल्य सर्व रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो आज पर्यंत भारतातील अनेक दिग्गज कलावंतांनी या रंगमंचावर आपली हजेरी लावली आहे. या संगीतसभे सोबतच कलावंतांच्या मुलाखती विविध विषयांवर चर्चासत्रे असे विविध उपक्रम शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसारासाठी हे प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून अविरतपणे प्रयत्न करत आहे. येथील बाल व युवा नवोदित कलावंतांना रंगमंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने मागील काही महिन्यांपासून बाल संगीत सभेचेही आयोजन या प्रतिष्ठानच्या वतीने केले जाते आहे,
गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी संपन्न होणाऱ्या या 97 व्या प्रातःकालीन मासिक संगीत सभेसाठी आपण सर्व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अभय शहा ,सचिव डॉक्टर रविराज पोरे ,श्री विशाल जाधव , डॉक्टर संदीप जगदाळे प्राध्यापक हरीसर्वोत्तम जोशी श्री दिनकर पाटील श्री केशव जोशी व आवर्तन प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी केले आहे. संगीत सभेनंतर सर्व रसिकांना रियल हनी चे प्रमुख श्री दिनकर पाटील यांच्या निवासस्थानी महाप्रसादासाठी आमंत्रित केले आहे.