लातूर येथील श्री केशवराज संकुलात दि. 28 जून रोजी, भारतीय शिक्षण प्रसारक
संस्थेच्या 71 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख यांनी
केलेले प्रकट चिंतन. सर्वच शाळा व संस्थाना लागु पडते, म्हणून आमच्या ‘माध्यम वेब पोर्टल ‘ च्या वाचकांसाठी
प्रसिद्ध करत आहे.- संपादक
दि.28 जून 2022 रोजी भा.शि.प्र. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त व गुणवंत विद्यार्थी
सत्कार सोहळा निमित्य अंत्यत प्रभावीपणे विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्थाचालक, माजी
विद्यार्थी व माजी शिक्षक यांची काय भूमिका असली पाहिजे हे सविस्तरपणे प्रकट केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संबंधात प्रवीण सरदेशमुख म्हणाले की, सध्या गुणवंत विद्यार्थी, शिक्षक,
शाळा व संस्था यांचे नाते एका संस्कृत श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे आहे. निशयाच शशी,
शशीनांच निशा – शशीनांम निशयाच विभाति नभ : पयसा कमलम्, कमलेन पय:पयसा
कमलेन विभाति सरा: रात्रीमुळे चंद्राला, चंद्रामुळे रात्रीला व दोन्हीमुळे आकाशाला शोभा
आहे. कमळामुळे पाण्याला, पाण्यामुळे कमळाला पण दोन्हीमुळे शोभा असते सरोवराला.
त्याचप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक यांच्यामुळे शाळेला व तिन्हीमुळे संस्थेला शोभा आहे . त्यामुळे
विद्यार्थी शिक्षक व पालक व शाळा व संस्था यांचे सगळयांचेच अभिनंदन!
संस्थेच्या 71 व्या वर्धापनदिनाबाबत बोलताना ते म्हणाले, संस्थेची स्थापना ज्या शिक्षक
स्वंयसेवकांनी. (श्री दत्तोपंत वैद्य, श्री राजाभाऊ चौसाळकर, श्री मधुकरराव देशपांडे, श्री
घोटीकर, श्री धायगुडे) यांना विनम्र अभिवादन केले व त्यांच्या कामाबाबत श्री बा.भ.बोरकरांच्या
काव्यपंक्ती उद्धरत केल्या.
देंखणे ते पाऊले जी,
ध्यासपंथी चालती,
वाळंवटातुन सुध्दा
स्वातिपद्मे रेखती
त्यामुळे आपण सगळेजण त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन पुढील वाटचाल करू यात.
असे ते म्हणाले.
शाळा कशी असावी हे सांगताना त्यांनी केरळ राज्यामधील एका शाळेतील एका
बाकावर बसणारे तीन विद्यार्थी श्री.टी.एन शेषण, श्री श्रीधरन व श्री उन्नी क्रष्णन् -तिघेही
देशाच्या सेवेमध्ये निवडणूक आयुक्त, रेल्वे सचिव व रेल्वे मंत्री झाले असे सांगितले. तसेच
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका शाळेचे दोन विद्यार्थी श्री महर्षी धोंडो केशव कर्वे
व श्री डॉ.पांडुरंग वामन काणे ह्या दोघांना भारतरत्नाचा बहुमान मिळाला. विद्यार्थी व शिक्षक
दोघेही शाळेचा लौकिक असा वाढवत असतात.
शाळेतून आईसारखे ममत्व व प्रेम मिळत असते. त्यामुळे शाळेच्या आठवणी येत असताना
ते म्हणाले की प्रत्येकजण शाळेबदलची भावना व्यक्त करताना म्हणत असतो की,
मला जेंव्हा जेंव्हा सहज मजला दर्शन घडे, स्मृतीचे तत्पूर्वी फलक पुढती आज खडे
21 व्या शतकातील शाळा व नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळेमध्ये भारतीय संस्कृतीतील
64 कलांचे प्राथमिक ज्ञान झाले पाहिजे, त्यामध्ये गायक, योगशास्त्र, वैदिक गणित, वेद व
अध्यात्म, देशाचा राष्ट्रग्रंथ भगवद्गीता याची ओळख असे अनेक विषय शिकवले गेले
पाहिजेत. शाळेमध्ये योगदिन, मराठी भाषा दिन, आरोग्य दिवस, पर्यावरण दिन, सेवा दिवस,
समरसता दिन साजरा करून त्यातून साहित्यिक, कवी, योगाचार्य, वैज्ञानिक, ऋषी मुनी,
निमार्ण झाले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
च्यविद्याविभूषित विद्यार्थी होण्यासाठी व विविध स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी,
तेलंगणा व राजस्थान राज्याप्रमाणे 8वी पासून फाऊडेशन कोर्स सुरू झाले पाहिजेत असे ते
म्हणाले.
संस्थाचालकासाठी बोलताना ते म्हणाले की, अमेरिकेमधील प्रसिध्द हार्वड व स्टॅनफोर्ड
विद्यापीठ हे तेथील माजी विद्यार्थी चालवतात, प्रतिवर्षी माजी विद्यार्थी आपल्या उत्पन्नातील
ठराविक वाटा आपल्या संस्थेला, विद्यापीठाला समर्पण करतात. त्यासाठी संस्थेचे माजी
विद्यार्थी व माजी शिक्षक यांचे संघटन वाढवले पाहिजे. व असा सर्मपण भाव प्रत्येक माजी
विद्यार्थी, माजी शिक्षक, संस्थाचालक यांच्यामध्ये वृध्दीगंत झाला पाहिजे हे सांगताना त्यांनी
गीतेतील 9 व्या अध्यायातील भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला उपदेश श्लोक सांगितला.
यत्करोषि यद्श्रांसि यज्जुहृोषि ददासि यत् ।
यत्तपस्यासि कौन्तेय तत्कुरूष्व मदर्पणम्॥
(आपण जे कर्म करतो, जे खातो, जे हवन करतो, जे दान देतो, जे तप करतो ते सर्व
आपण अर्पण केले पाहिजे.
त्यानुसार माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व संस्थाचालक यांनी संस्थेसाठी समर्पण भाव
वाढवला पाहिजे. आपल्या संस्थेनी 100 एकर परिसरात 64 कलांचे ज्ञान देणारे भारतीय
विद्यापीठ उभा करून जगभरातील विद्यार्थी भारतीय शिक्षणासाठी आपल्याकडे आले पाहिजेत
हा संकल्प वर्धापनदिनानिमित्याने आपण केला पाहिजे. हे मनोगत व्यक्त करून सगळ्यानांच
शैक्षणिक चिंतन करण्यास त्यांनी प्रवृत केले.