शंभरीच्या उंबरठ्यावर…!!
मला दीर्घायुष्य लाभले ही विधात्याची कृपा आहे मी त्यासाठी विशेष काहीच केले नाही.मी शिकलो बरेच पण माझे अजून खूप काही शिकायचे राहून गेले याचे असमाधान आहेच.मला अजून खूप समजून घ्यायचे आहे, शिकायचे आहे त्यासाठी पुन्हा मला याच पुण्यभूमीत जन्म मिळावा ! हे उदगार आहेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे….
ज्यांचा श्वास अन श्वास आणि अवघं जगणंच शिवमय झाला आहे असे महाराष्ट्र भूषण सन्मानित पदम विभूषण आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज ९९वर्षे पूर्ण करून शंभरीत पदार्पण करीत आहेत त्यांना वाढदिवसाच्या अंतःकरण पूर्वक शुभेच्छा…!!