विलासराव देशमुख फाउंडेशन आणि उड्डाण उपक्रमा अंतर्गत
राबविलेल्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण प्राप्त युवक युवतींना
सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
लातूर (प्रतिनिधी) १२ ऑगस्ट २०२३:
विलासराव देशमुख फाउंडेशन आणि उड्डाण उपक्रमा अंतर्गत लातूर शहर आणि ग्रामीण भागातील युवक युवतींना विविध किमान कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञानी युवक युवतींना प्रशिक्षण दिले होते. या प्रशिक्षणार्थींना शनिवार दि. १२ ऑगस्ट रोजी ट्वेंटीवन ऑरगॅनिक लिमिटेडच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
विलासराव देशमुख फाउंडेशन लातूर जिल्हयात विधायक कामासाठी कार्यरत आहे. संस्थेने दुष्काळ, पाणी टंचाई या अडचणीच्या काळात शहर, गावासह वाडीतांडयावर लातूरकरांना घरपोच पाणी पुरवठा करण्यासाठी जलसेवा उपक्रम राबविला. या माध्यमातून अनेकांची तहान पाण्याचे दुर्भिष्य असतांना त्यावेळी भागवली. यानंतर येथील गावात सुविधा निर्माण करण्यासाठी स्मार्ट व्हिलेज उपक्रम हाती घेतला. नागरीकांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर घेण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपन चळवळ सुरू केली, शहरातील रस्त्यावर दुतर्फा आणि गावात व गावातील शाळेत वृक्षारोपन मोहीम राबवली, परीसर स्वच्छतेसाठी स्वच्छता मोहीम आखली, शासकीय योजना उपक्रमांची माहिती देणे, ग्रामविकासासाठी पूरक योजना राबविणे आदी महत्वाचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.
विलासराव देशमुख फाऊंडेशन लातूरकरांच्या सेवा आणि सुवीधेसाठी सामाजिक भावनेतून विविध उपक्रम राबवत कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रोजगार निर्मीतीसह सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय काम देखील सुरू आहे. या उपक्रमास ट्वेंटीवन ऑरगॅनिक लिमिटेडच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून या संस्थेच्या माध्यमातून युवक-युवतींना स्वावलंबन व महीलांना सक्षम करण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशन आणि मेट्रो पोलीस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
उड्डाण प्रकल्प उपक्रमातर्गत युवक-युवतींना रोजगार व स्वंयरोजगार मिळणेसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते. ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगार आणि व्यवसायभिमूख शिक्षण, मार्गदर्शन तज्ज्ञाकडून दिले जाते. लातूरच्या ग्रामीण भागात व शहरी भागातील युवक युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार व कौशल्य विकासावर आधारित विविध कोर्सेस चालविले जातात.
या उडडान प्रकल्पात सेल्फ डिफेन्स, रिटेल सेल्स व असोसिएट, इंग्लिश स्पोकन हे तीन प्रशिक्षण कोर्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लातूर शहर व ग्रामीण भागात आठ ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत. या प्रशिक्षणासाठी लातूर तालुक्यातील एकूण ४२९ युवक आणि ६६८ युवती असे १०५७ युवक युवतींनी आपला प्रवेश नोंदविला आहे. त्यांना त्या त्या क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक प्रशिक्षण दिले आहे. ट्वेंटीवन ऑरगॅनिक लिमिटेडच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी समन्वयक संगीता मोळवणे, धनंजय राऊत, अंकुर हायटेक नर्सरी संचालक अविनाश देशमुख, प्रकल्प समन्वयक रमेश जी. राजे, अध्यक्ष श्री सद्गुरू नामानंद शिक्षण संस्था, सौ,महापूर सरपंच कल्पना संदीप माने, माजी पंचायत समिती लातूर सदस्य पंडित ढमाले, गणपतराव ढमाले, उपाध्यक्ष सद्गुरु नामानंद शिक्षण संस्था साहेबराव माने, सचिव सद्गुरु नामानंद शिक्षण संस्था विश्वनाथ पांचाळ, सहसचिव सद्गुरु नामानंद शिक्षण संस्था लिंबराज जी.माने, विठ्ठल रावजी माने, मुख्याध्यापक भागवत भोसले, पवार सर, शिंदे सर, शरद माने, श्रीकांत माने, संदीप माने,.वाडकर, शिवणकर,शिंदे मॅडम, सोशल प्लॅनर गजानन बोयणे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
———————————-