विद्यार्थ्यांचे एस एस बी कॅम्प

0
236

 

श्री त्रिपुरा महाविद्यालयात NDA च्या विद्यार्थ्यांचे त्रिदिवसीय SSB कॅम्प संपन्न

लातूर :; श्री त्रिपुरा महाविद्यालय लातूर येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल सुशील चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले होते, महाविद्यालयात चालणाऱ्या नॅशनल डिफेन्स अकॅडेमी च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्याच्या समोर आपल्या SSB मैदानी प्रात्यक्षिके करून सर्वांची मनं जिंकली. प्रसंगी कर्नल सुशील कुमार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे शंका निरसन करून मनोबल वाढवले व देशप्रेमाविषयी जाणीव करून दिली, सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष श्री उमाकांत विरप्पा होनराव, महाविद्यालयाच्या सचिव तथा प्राचार्या सौ. सुलक्षणा शिवरुद्रप्पा केवळराम, संस्थेच्या कोषाध्यक्षा कु. प्रेरणा उमाकांत होनराव, कार्यकारी संचालक श्री ओंकार उमाकांत होनराव, उपप्राचार्य श्री राजकुमार ज्ञानोबा केदासे, विधिज्ञ श्री अजिंक्य चंद्रशेखर पारशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदेश पगार तर आभार श्री ओंकार उमाकांत होनराव यांनी मानले.

दि. १७-०८-२०२१ ते १९-०८-२०२१ या दरम्यान कर्नल सुशील कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये NDA च्या लातूर, बेळगाव, सांगली व हुमनाबाद शाखेच्या विद्यार्थ्यांना NDA स्पर्धा परीक्षा आणि पुढील SSB मुलाखत व मैदानी चाचण्याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले, या कार्यशाळेसाठी प्रा. संचित तिपायले, प्रा. सुदेश पगार, प्रा. भारत तिडके, प्रशिक्षक दंडिमे के.एस. व महेश झुंजे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here