औसा : औसा तालुक्यातील लोदगा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत गेली 37 वर्षाची सत्ता परिवर्तन करून चेअरमन पदी शरद लिंबाराज भोईबार तर व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत गोविंद तळेगावे यांची निवड करण्यात आली या निवडी बद्दल शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी नुतन चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळाचा सत्कार केला
लोदगा येथील बहुचर्चित निवडणूकीकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले होते. लोदगा व कवठा असे दोन गावची सहकारी संस्था आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.सरतापे यांनी काम पाहिले. यावेळी संचालक जयप्रकाश उजळंबे , अमोल पाटील,किशोर गोमारे, महादेव खंडागळे,श्रीमंत उजळंबे हे उपस्थित होते. या निवडीसाठी ज्ञानोबा गोमारे, स्वरूप डीग्रसे, शंकर लांडगे , युवा सेना उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे , राम मुकदम यांनी परिश्रम घेतले.