चेअरमन आमदार धीरज देशमुख यांची माहिती
लातूर दि. ३०..
पंतप्रधान पीक विमा भरण्यासाठी उद्या रविवार ३१ रोजी अंतीम दिवस पण रविवार असल्याने शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचणी निर्माण येवू नये यासाठी रविवारीही दिनांक ३१ जुलै रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखा आपल्या स्थरावर शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेण्यासाठी सुरु राहतील असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी केले आहे.
यासाठी जिल्ह्यातील लातूर उदगीर, चाकूर, जळकोट, अहमदपूर,रेणापूर,शिरूर अनंतपाळ, निलंगा ,जळकोट, अहमदपूर , लातूर तालुक्यातील व शहरातील काही शाखा पिक विमा भरण्यासाठी सुरूच राहतील यांची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले आहे