23.1 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeठळक बातम्या*लातूरातील तरुणांची अशीही गांधीगिरी*

*लातूरातील तरुणांची अशीही गांधीगिरी*

प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूरच्या वतीने मनपाने सोय करून दिलेल्या खड्ड्यात विसावा घेत लक्षवेधी गांधीगिरी

.■मनपा लातूर महानगर पालिकाचा सार्थ अभिमान.■
◆ पोस्ट ऑफिस बसस्थानक मागील परिसरात  प्रभुराज प्रतिष्ठाण लातूरच्या  वतीने बोलके फलक घेऊन गांधीगिरी

 लातूर ; दि. २ ( प्रतिनिधी) –लातूर शहरात सर्वत्र ठिकाणी सावेवाडीतील पूर्ण रस्ता , बसडेपो बाजूस समांतर रोड,गांधी चौक पोस्ट ऑफिस ते अग्रेसन भवन बसस्थानक मागील परिसर असे अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था चाळणी सारखी झाली आहे। या रस्त्याचा वापर बाहेरून येणारे व शहरातील जनता जास्त प्रमाणात वापर होतो त्यात असलेले खड्डे ही जनतेला त्रासदायक ठरत आहेत.

या रस्त्याची दुरुस्ती उनाळ्यांत कांही महिन्यापूर्वी केली होती तरीही  रस्त्याची दूरवस्था झाली .हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे दिसून येते .या निष्काळजीपानामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतं आहे.  पावसाळ्यात खड्डे पडत असल्याने याची दक्षता घेण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरत आहे. गुत्तेदार व मनपा अधिकारी यांच्या संगमताने अश्या कामाची सुरवात होत असल्याचे दिसून येते. पण जनता मनपाचा कर लाखो रुपयांच्या स्वरूपात भरणा करून देखील मनपा प्रशासन जणतेला चांगल्या दर्जेचा रस्ता व मूलभूत सोई देऊ शकत नाही याची खंत जनतेला वाटत आहे. याबाबत मनपा करत नसल्याने जनतेत रोष होत आहे.

या रस्त्याचा वापर मनपा कर्मचारी व प्रतिनिधी ही करीत असतील तरीही या कडे त्यांचेही दुर्लक्ष होत आहे.तसेच  गल्ली पासून मेन रोड प्रत्तेक ठीकानी खड्डेच खड्डे दीसून येतात  त्यात पावसाचे साचलेले पाणी यामुळे खड्ड्याचा अंदाज  लागत नासल्याने अपघात होत आहे.याचा त्रास सर्व  सामान्य जनतेस होतोच पण वाहनधारक खड्डा चूकवीन्या प्रयत्नात  आपघातास समोरे जातो व शाररीक आजार मनक्याचा,पाठीचा कमरेच्या त्रासापासून नागरीक परेशान झाला आहे .यात विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासर्व बाबी बाबत मनपाच्या निदर्शनास आणून सुद्धा या बाबीकडे प्रशासन दूर्लक्ष करीत  आहे.

प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने “अँड. अजय कलशेट्टी” यांच्या नेत्रत्वात गांधी चौक पोस्ट ऑफिस परिसरात “मनपा लातूर महानगर पालिकाचा सार्थ अभिमान….जिकडे तिकडे खड्डेच खड्डे आणि खड्ड्यात पाणीच.. पाणी.. ! असे बोलके फलक घेऊन  मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा  प्रयत्न केला.यावेळी अँड.अजय कलशेट्टी,डॉ.संजय जमदाडे, यु.एस.मश्याक, एम. एम. पाटील,हुसेन पठाण,पारस चापसी,सचिन गोलावार,तुषार इंगळे, युवराज बेल्लूरे, शिरीष माळी, दत्ता गायकवाड, मोतीराम कदम,हरीश चेटवानी अशोक पंचाक्षरी,विलास भूमकर,मुन्ना बट्टेवार, सुरेश कोटलवार,शिवा रोडे,सोमनाथ खुदासे,पारस चापसी,गोपाळ खंडागळे आदी  उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]