लातूरचे महापौर गोजमगुंडे यांचा सन्मान

0
322
देशातील तीन सर्वोत्कृष्ट महापौरांमध्ये विक्रांत गोजमगुंडे यांचा समावेश
मॉडेल शहर व्यवस्थापन बाबत करणार मार्गदर्शन
लातूरच्या महापौरांच्या कार्याची देशपातळीवर दखल.
 लातूर/प्रतिनिधी: प्रजातंत्र २०२१ या अनोख्या महोत्सवा अंतर्गत आयोजित कार्यक्रमात देशातील ३ सर्वोत्कृष्ट महापौर हे मॉडेल शहर व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचाही यात समावेश असून त्यांच्यासमवेत श्रीनगरचे जुनैद अजीम मत्तू आणि दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांचेही मार्गदर्शन होणार आहे.
   प्रजातंत्र २०२१ हा लोकशाही मधील एक अनोखा व्हर्च्युअल उत्सव आहे. या अंतर्गत आयोजित उपक्रमात देशातील २१ राज्य आणि ३० शहरांसह ६७ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. मॉडेल शहर व्यवस्थापन हा विषय घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आयोजित स्पर्धेतून निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना तीनही महापौर मार्गदर्शन करणारा आहेत.
   लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी शहर व्यवस्थापनात केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. विविध फेर्‍यांनंतर आता दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते  ११.४५ या कालावधीत या तीनही महापौरांचे मॉडेल शहर व्यवस्थापनाबाबत असणारे विचार विद्यार्थ्यांना ऐकता येणार आहेत. झूम ॲपच्या माध्यमातून यात सहभागी होता येणार आहे.
  या उपक्रमाच्या अंतिम फेरीत लातूरचे उपक्रमशील महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची मार्गदर्शन करण्यासाठी निवड झाली आहे.
त्यांचे विचार,आजवर केलेले काम,राबवलेल्या योजना यासंबंधी विचार देशभरातील विद्यार्थ्यांना ऐकता येणार आहेत. त्यांच्यासमवेत श्रीनगरचे जुनैद अजीम मत्तू आणि दक्षिणी दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.
   दिल्ली विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या आत्माराम सनातनधर्म महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अमित सिंग हे यावेळी समन्वयकाची भूमिका भूमिका बजावणार आहेत.
लातूरकरांचा सन्मान…..
देशातील अनेक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील महापौरांमधून लातूरचे प्रथम नागरिक विक्रांत गोजमगुंडे यांनी निवड झाली आहे.आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची दखल देशपातळीवर घेतली गेली. खऱ्या अर्थाने हा प्रत्येक लातूरकराचा सन्मान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here